शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक पांडे व नताशाचा लवकरच घटस्फोट होणार?, भारताच्या विजयानंतर नवऱ्याबरोबर दिसलीही नाही, म्हणाली, “देव आयुष्यातील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 8, 2024 | 1:11 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Natasa Stankovic And Hardik Pandya Divorce

हार्दिक पांडे व नताशाचा लवकरच घटस्फोट होणार?, भारताच्या विजयानंतर नवऱ्याबरोबर दिसलीही नाही, म्हणाली, "देव आयुष्यातील…"

प्रसिद्ध क्रिकेटर हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपासून हे जोडपे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. परंतु आतापर्यंत हार्दिक व नताशा या दोघांनी या अफवांवर मौन बाळगले आहे. हार्दिक नुकताच T20 वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकून परतला आहे, पण तो नताशाला भेटला नाही. यानंतर आता नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना असं वाटू लागलं आहे की नताशाने हार्दिकबरोबर घटस्फोट घेतला आहे. (Natasa Stankovic And Hardik Pandya Divorce)

नताशा व हार्दिक दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मिडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असलेले पहायला मिळत आहेत. ते खूप पोस्ट शेअर करत आहेत पण एकमेकांबरोबर फोटो शेअर करताना दिसत नाही आहेत. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती असं म्हणताना दिसत आहे की, “मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करुन देऊ इच्छिते की देवाने लाल समुद्र तसाच ठेवला असून त्याने फक्त त्याचे दोन भाग केले आहेत. याचा अर्थ असा की तो तुमच्या जीवनातून कोणतीही समस्या दूर करणार नाही, परंतु त्यातून मार्ग काढेल”.

आणखी वाचा – सलील कुलकर्णींनी पुण्यामध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, हॉटेलचं आईच्या हस्ते उद्घाटन, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

आजकाल नताशा तिचा मुलगा अगस्त्याबरोबर वेळ घालवत आहे. शनिवारी सकाळी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये नताशा कारच्या आत सेल्फी घेताना दिसली होती. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री जिममध्ये तिचे ॲब्स दाखवताना दिसली. ही पोस्ट शेअर करताना नताशाने लिहिले, “कृतज्ञतेत राहत आहे”.

आणखी वाचा – नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्…; फोटो व्हायरल

नताशा व हार्दिक यांचे मे २०२० मध्ये लग्न झाले होते. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले. त्यानंतर २०२३ मध्ये दोघांनी पुन्हा लग्न केले. हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार हा विवाह पार पडला. नताशा व हार्दिकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags: bollywood gossipHardik Pandya DivorceNatasa Stankovic And Hardik Pandya DivorceNatasa Stankovic confirms divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
vishal pandye parents on arman malik

"गुन्हेगाराला शोमधूनच बाहेर काढा", अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशाल पांडेच्या आई-वडिलांचा संताप, म्हणाले, "चुकीचं काय?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.