शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णीचं बॉलिवूडशी आहे खास कनेक्शन, कुटुंबाविषयी अधिक जाणून घ्या…

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 25, 2025 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mamta kulkarni family

ममता कुलकर्णी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. २४ वर्षांपूर्वी त्यांनी मनोरंजन क्षेत्राला राम राम केला आणि केनियाला स्थायिक झाल्या. सध्या त्या भारतात परतल्या असून नुकत्याच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिल्या. महाकुंभमेळ्यामध्ये त्यांनी संन्यास घेतला. संन्यासी बनण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यावेळी त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली आहे. त्यांनी हा संन्यास घेण्याचा स्वतःचा निर्णय असल्याचे सांगितले. महामंडलेश्वर दशनामी संप्रदायातील हिंदु भिक्षूंसाठी एक विशेष उपाधी आहे. यातील प्रमुख व्यक्ती सनातन धर्माचा प्रसार करतात. (mamta kulkarni family)

ममता यांचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे नाव आधी पद्मावती कुलकर्णी होते. त्यांचे शिक्षण मुंबईमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट येथे झाले.  त्यांना आधी अभिनयामध्ये काहीही रस नव्हता. मात्र त्यांच्या आईने या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केले. आईचे स्वप्न होते की मुलीने अभिनेत्री व्हावं. त्यामुळे ममता यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. ‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांनी ७० दशकामध्ये ममता यांच्या आईला आईच्या भूमिकेमध्ये घेण्याचा विचार केला होता मात्र लग्न होणार असल्यामुळे त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला.

आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा

View this post on Instagram

A post shared by beautiful_Mamta_Kulkarni (@_mamta_kulkarniofficial21)

ममता यांच्या वडिलांचे नाव मुकुंद कुलकर्णी आहे. त्यांची बहीण मुलीना कुलकर्णी १९९६ साली अभिनेत्री म्हणून समोर आल्या. त्यांनी काही कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्री तन्वी अजमी व ममता या एकमेकींच्या बहिणी आहेत. ममता यांनी आजवर लग्न केले नाही असं अनेकदा सांगितलं आहे. दुबईमधील अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्न केल्याच्याही अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र ममता यांनी या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले.

आणखी वाचा – “चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत मंत्री उदय सामंतांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, “महाराजांच्या सन्मानाला बाधा…”

 ममता यांनी १९९२ साली ‘तिरंगा’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी आजवर जवळपास ४० बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. २००१ मध्ये रिलीज झालेला ‘छुपा रुस्तम’ हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता.   

Tags: bollywood actressfamilyMamta Kulkarni
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mrunmayee and Gautami Deshpande fight

मृण्मयी देशपांडे बहिणीला चावताच भांडणं वाढली, गौतमी देशपांडेचा नवरा मध्ये पडताच झालं असं की…; धमाल व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.