बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान ही एक लोकप्रिय जोडी आहे. दोघंही अभिनय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. अभिनयाबरोबरच दोघांच्या खासगी आयुष्यामुळेही ते अधिक चर्चेत असतात. २०१२ साली सैफ व करीना यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर तैमुर व जेह या दोन मुलांचे आई-वडील झाले. सध्या सैफ व करीना त्यांच्या मुलांसमवेत बाहेर फिरण्याचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या अनेक फोटो व व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. या फोटोना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे. (kareena kapoor on saif ali khan)
करीना व सैफ यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी जेव्हा लग्न केले तेव्हा त्यांच्या लग्नाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र याकडे लक्ष न देता आपल्या सुखी संसारला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांची एक मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. त्यावेळी सैफबरोबर लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर कोणत्या गोष्टींवरुन भांडणं होतात याबद्दलही सांगितले आहे. करीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “लग्नानंतर माझ्यामध्ये खूप चांगले बदल झाले. मी खूप जबाबदार झाले आहे.
पुढे ती म्हणाली, “एकमेकांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. तो माझ्याबरोबर जे करेल त्याच्याबरोबरही मी तेच करते. जेव्हा मी चुकीची असेल तर मला तो सांगतो आणि तो काही चुकला तर मी सांगते”. त्यानंतर तिला प्रश्न विचारला की, “तुमच्या नात्यामध्ये काही कठीण प्रसंग येतात का?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “हो. आमच्या नात्यात काही वेळेस खूप कठीण प्रसंग येतात. सैफ सकाळी साडेचार वाजता घरी येतो आणि झोपून जाती. जेव्हा तो उठतो तेव्हा मी कामासाठी बाहेर पडलेली असते. तसेकह मी परदेशात ट्रीपसाठी जाते तेव्हा आम्ही एकमेकांना भेटूही शकत नाही. एकमेकांसाठी वेळ काढणे खूप कठीण होते”.
भांडणाविषयी करीना म्हणाली की, “एसीच्या तापमानावरुन आमच्यात नेहमी वाद होतात. कारण सैफला खूप थंड वातावरण हवं असतं आणि मला गरम वातावरण हवं असतं. पण सगळं झालं की आम्ही मधलं एक तापमान ठेवतो आणि झोपून जातो. तसेच कामामुळे एकमेकांना वेळ देऊ न शकल्यानेही आमच्यात वाद होतात”, असेही तिने सांगितले.