Kangana Ranaut on Bangladesh PM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतसध्या अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केलए आहे. तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. अभिनयाबरोबरच तिने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहेत. अशातच तिने आता मनोरंजन क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेश येथील मंडी या भागातून ती निवडून आली. त्यानंतर चंदीगढ एअरपोर्टवर एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानाखाली मारल्यानेही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अशातच आता तिने एक बांगलादेशामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे त्यावर भाष्य केले आहे.
सध्या बांगलादेशात अस्थिर वातावरण असलेले पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या उग्रवादी आंदोलनामुळे परिस्थिती चिघळलेली दिसून आली. यामुळे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्या राजाश्रयासाठी भारतात आल्या. या सर्व प्रकरणावर आता सगळ्यांच्या नजरा टिकून आहेत. आता यावर कंगना भाष्य केले आहे. तिने सुरक्षेच्या प्रश्नाला धार्मिक रुप दिले आहे. जो मुस्लिम देशात राहतो तिथे एखादा माणूस कधीही सुरक्षित असू शकत नाही असे तिने विधान केले आहे.
याबाबत कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लोकांच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “भारत हा आपल्या आजूबाजूच्या देशांची मातृभूमी आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटते हे आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण भारतात राहणाऱ्या सर्वांनाच विचारते की फक्त हिंदू राष्ट्रच का? रामराज्य का? पण हे असं का आहे हे स्पष्ट आहे. मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही. स्वतः मुसलमानदेखील नाहीत. अफगानिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश व ब्रिटनमध्ये जे काही होत आहे ते खूप वाईट आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण रामराज्यात राहत आहोत. जय श्री राम!!”
कंगनासहित अभिनेत्री सोनमदेखील बांगलादेशच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. तिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर लिहिले की, “हे भयानक आहे. आपण सर्व जण बांगलादेशातील लोकांसाठी प्रार्थना करुया”. दरम्यान आता देशभरातून या सर्व प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.