शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 3, 2023 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Kangana ranaut hints to contest loksabha election

Kangana ranaut hints to contest loksabha election

बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक धाकड व्यक्तिमत्त्वाची अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर परखडपणे मतं मांडताना दिसते. मग तो राजकीय विषय असो किंवा सामाजित प्रत्येक मुद्द्यावर ती स्वतःचं मत ठामपणेे मांडते. त्यामुळे तिला बऱ्याचदा राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार का?, असा प्रश्न विचारला जातो. पण प्रत्येक वेळी ती या प्रश्नावर नकार दिते. पण नुकतीच ती द्वारकेला श्री कृष्णाच्या दर्शनासाठी गेली होती त्यावेळी तिने मीडियाबरोबर बोलताना राजकारणात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं आहे. (Kangana ranaut hints to contest loksabha election)

‘तेजस’ चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर कंगना गुजरातच्या प्रसिद्ध यात्राधाम द्वारकाधीश मंदिरात पोहोचली. तिथे तिने द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. तसंच तिने नागेश्वर मंदिरात जाऊनही आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिने मीडियाबरोबर संवाद साधला. त्यावेळी कंगनाने लोकसभा निवडणूक लढण्याबद्दल हिंट दिली आहे. यावेळी ती बोलताना म्हणाली, “जर भगवान श्री कृष्णाची कृपा राहिली तर लोकसभा निवडणूक लढणार”, असं वक्तव्य केलं.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

आणखी वाचा – ऑनलाईन शॉपिंग स्कॅममध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना, म्हणाली, “मी पूर्णपणे…”

कंगनाने द्वारकेतील फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्या फोटोंना कॅप्शन देत तिने  लिहीलं, ‘काही दिवसांपासून हृदय खूप व्याकुळ होतं. द्वारकाधीशचं दर्शन घ्यावं असं मनात आलं. श्री कृष्णाच्या या दिव्य द्वारका नगरीत आल्यानंतर येथील धुळीचं दर्शन घेताच माझी सगळी चिंता माझ्या पायाकडे येऊन पडल्यासारखं वाटलं. आता माझं मन पूर्णपणे स्थिर झालं आहे. अनंत आनंदाची अनुभूती झाली. हे द्वारकाधीश अशीच तुमची कृपा माझ्यावर ठेवा. हरे कृष्णा’.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

आणखी वाचा – Shah Rukh Khan Birthday : मध्यरात्री मन्नतबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून शाहरुख खानलाही यावं लागलं बाहेर, म्हणाला, “रात्री उशिरापर्यंत…”

यावेळी कंगना मीडियाबरोबर बोलताना म्हणाली, ‘द्वारका नगरी ही दिव्य नगरी आहे. इथली प्रत्येक गोष्ट खूप अद्भूत आहे. येथील प्रत्येक कणात द्वारकाधीश सामावलेले आहे आणि द्वारकाधीशच्या दर्शनाने आपण धन्य होऊन जातो. माझा नेहमीच प्रयत्न असतो की मी इथे दर्शनाला यावं. पण कामामुळे येणं संभव होत नाही. असं वाटतं सरकारने अशी सोय केली पाहिजे ती पाण्याच्या खाली असलेली द्वारका बघू शकू. आपलं जे महान नगर आहे ज्यात भगवान श्री कृष्ण वास करत आहेत ते आमच्यासाठी स्वर्गाहूनही कमी नाही’, असं सांगत तिने यासह राम मंदिराबद्दलही वक्तव्य केलं.  

Tags: bollywood actresscontest loksabha electiondwarkadhish templekangana ranaut
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
FIR Against Elvish Yadav

रेव्ह पार्टी, विषारी साप अन् परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, 'बिग बॉस' विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.