अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या खूप जास्त चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे. सध्या ती अभिनयामुळे नाही तर राजकारणामुळे चर्चेत आली होती. २०२४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तिला हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून ती निवडून आली होती. तिच्या विजयाने सगळ्यांनीच तोंडात बोटंही घातली. निवडणूक जिंकल्यानंतर चंदीगड एअरपोर्टवर तिला एका महिला जवानने कानशिलात मारल्याची घटनाही समोर आली होती. या घटनेमुळे तिचे काही जणांनी समर्थन केले तर काहींनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिकादेखील केली गेली. अशातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. (kangana ranaut on olympics paris 2024)
नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीने आता पॅरिस येथे सुरु झालेल्या ऑलिंपिक गेम्सवर निशाणा साधला आहे. ऑलिंपिकमध्ये जगभरातील सर्वच खेळांचा समावेश असतो. सर्व ठिकाणी आता पॅरिस ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याची चर्चा रंगली आहे, मात्र यावरुन आता कंगनाने भाष्य केले आहे. तिने या सगळ्यावर टीका करत भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर ऑलिंपिक सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिला काय आवडलं नाही याबद्दल सांगितले आहे. कंगनाने फोटो शेअर करत ‘द लास्ट सपर’चा एक फोटो व व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका लहान मुलाचा सहभाग दिसल्याने आक्षेप घेतला आहे. तिने फोटो शेअर करत भावनादेखील वीनत केल्या आहेत. तिने लिहिले की, “पॅरिस ऑलिंपिकने hyper sexualized Act मधील ‘द लास्ट सपर’मध्ये लहान मुलाला समाविष्ट केले. इतकेच नाही तर कपड्यांशिवायदेखील एका व्यक्तीला दाखवण्यात आले. त्या व्यक्तीच्या शरीरावर निळ्या रंगाचे पेंट आहे व जिजसचे चित्र काढले होते.

पुढे तिने लिहिले की, “यांनी ख्रिश्चन धर्माची मस्करी केली आहे. वामपंथियांनी २०२४ च्या ऑलिंपिकला पूर्णपणे गिळंकृत केले आहे”. त्यानंतर अजून एक फोटो शेअर करत लिहिले की, “अशा प्रकारेच फ्रांसमध्ये ऑलिंपिक २०२४चे स्वागत केले होते का? तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम करुन त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे? सॅटनच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे. त्यांना हेच दाखवायचे आहे का?”.तसेच हा उद्घाटन सोहळा Homosexuality वर आधारित आहे”.

त्यानंतर तिने पुढे लिहिले की, “मी Homosexuality च्या विरोधात नाही, पण या सर्व गोष्टी माझ्या आकलन शक्ती पलीकडील आहे हे सगळं. पण ऑलिंपिक लैंगिकतेशी कसा कसा काय संबंधित आहे? हे सगळं खूप भयानक आहे”. असं म्हणत कंगनाने खरमरीत टिका केली आहे.