बॉलिवूडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये जान्हवी कपूरचे नाव घेतलं जातं. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जान्हवीची आई म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘धडक’ या चित्रपटामधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाला पप्रेक्षकांचा भरघोस प्रतिसादही मिळाला. तिच्या अभिनयाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र जान्हवीच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. (Janhvi kapoor Surgeon)
राधिका मर्चट व अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये जान्हवीची उपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. यावेळी तिच्या प्लॅस्टिक सर्जरीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली दिसून आली. राधिक व अनंत यांच्या लग्नात जान्हवीचे डॉक्टरदेखील होते. याच डॉक्टरांनी अभिनेत्रीची राईनोप्लास्टी केली होती. राईनोप्लास्टी म्हणजे नाकाची केलेली शस्त्रक्रिया होय. राधिका व अनंत यांच्या लग्नामध्ये दिसल्यापासून ते अधिक चर्चेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या नाकावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचे नाव राज कनोडिया हे नावाजलेले सर्जन आहेत. नुकतीच त्यांनी रेडिटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे सगळ्यांकचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला की, त्यांनी जान्हवीच्या आधी क्लोइ कर्दाशियनवरही उपचार केले आहेत. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, डॉक्टर राज कनोडिया हे लग्नासाठी हजर होते. क्लोइने तिची रायनोप्लास्टी याच डॉक्टरांनी केल्याचे मान्य केले आहे. पण डॉक्टरांनी HIPPA चं उल्लंघन नाही का? या प्रतिक्रियेला पसंती दर्शवली. तसेच अशा डॉक्टरांवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही जे अशा प्रकारच्या पोस्टला लाइक करत आहेत”.
तसेच या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “HIPPA अमेरिकेतील असे उपचार करणाऱ्या व अमेरिकन नसणाऱ्यांना कव्हर देतात. पण जर जान्हवीने या सहमती पत्रावर सह्या केल्या तर ते नियमांचे उल्लंघन ठरु शकत नाही”. २०१८ साली ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण केले. यावर्षी तिचा राजकुमार राव बरोबरचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.