सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रत्येक फोटोचे पैसे घेतात आणि…; जान्हवी कपूरने पापाराझी छायाचित्रकारांची केली पोलखोल, पैसे दिले तरच विमानतळावर राहतात हजर, कसे कमावतात पैसे?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 25, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
janhvi kapoor on paparazzi

जान्हवी कपूर सध्या खूप चर्चेत आहे. तिचा व राजकुमार राव यांचा नवीन चित्रपट ‘मि अँड मिसेस माही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व राजकुमार व्यस्त आहेत. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसच अनेक मुलाखतीच्या माध्यमातूनदेखील ती अनेक मुद्यांवर भाष्य करताना दिसत आहे. यावेळी तिने फोटोग्राफर्सबद्दल भाष्य केले असून ती यामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिच्या एका विधानामुळे फोटोग्राफर्सची पोलखोल झालेली दिसून येत आहे. (janhvi kapoor on paparazzi)

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी ‘लल्लनटॉप’ला मुलाखत देण्यासाठी पोहोचली. तिने फोटोग्राफर्सना ‘सेलिब्रिटींचे रेशन कार्ड’ म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले की, “आता चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. त्यामुळे फोटोग्राफर्सना एअरपोर्टवर फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले होते. पण जेव्हा प्रमोशन नसते, मी शूटवर जाणार नसेन तेव्हा मला या सगळ्यापासून लांब राहायला आवडते. तेव्हा जर त्यांनी अधिक कष्ट घेतले म्हणजे अनेकदा गाडीला देखील फॉलो करावे लागते. पण त्यावेळी त्यांना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात. हे फोटोग्राफर्स प्रत्येक कलाकाराचे रेशन कार्डच असतात”.

आणखी वाचा – सहा वर्षांचा संसार मोडत केलं दुसरं लग्न, दोन महिने हनिमून केल्यानंतर वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा घेणार घटस्फोट?, शेअर केलेल्या पोस्टमुळे खळबळ

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

पुढे ती म्हणाली की, “प्रत्येकाच्या फोटोला काही ना काही किंमत असते. जर तुमच्या फोटोची किंमत जास्त असेल तर ते येतात. गाडीच्या मागे धावतात. पण जर किंमत कमी असेल तर केवळ इव्हेंटच्या इथे पोहोचतात. त्यांना बोलावलं तर येतात पण कधीकधी येत नाहीत. माझ्या या चित्रपटाच्या निमित्ताने मी जवळपास २५ ते ३० वेळा विमानाने प्रवास केला. मात्र चार ते पाच वेळाच मीडिया फोटो काढण्यासाठी तिथे पोहोचले”.

आणखी वाचा – आधी सासरी जंगी स्वागत आता लेकीला घेऊन इंटरनॅशनल ट्रीपला निघाली सई लोकूर, नवऱ्यासह एअरपोर्टवरील फोटोही केले शेअर, Photo व्हायरल

जीमबाहेर फोटो काढण्यावरुनदेखील तिने खुलासा केला. ती म्हणाली की, “लोकांनी मला घट्ट कपड्यांमध्ये पाहू नये असे मला वाटते. हे फोटो जर लोकांच्या समोर आले तर किती घट्ट कपडे घालते असे सगळे जण बोलतात. त्यापेक्षा फोटो न काढलेले बरे असे वाटते. मी त्यांना जीमच्या बाहेर बोलावत नाही. तसकह त्यांनी तिथे येऊ नये अशी विनंतीदेखील मी केली आहे. त्यानंतर ते आले नाहीत”.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मि अँड मिसेस माही’ या चित्रपटात राजकुमारबरोबर दिसणार असून हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: janhavi Kapoorpaparaaziphotographers
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Duniyadari marathi movie once again entered in the theatres after 11 years

११ वर्षांनंतर 'दुनियादारी' चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये दाखल, मित्रांची जादुई दुनिया पुन्हा अनुभवायची प्रेक्षकांना संधी, पुन्हा आठवले जुने दिवस

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.