बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आपल्या अभिनयातून मराठीसह बॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे. मराठीतील ‘वेड’ सारख्या चित्रपटातून त्याने सगळ्या प्रेक्षकांना त्याच्या अभिनयातून वेड लावलं आहे. अशा या सगळ्यांच्या लाडक्या रितेश दादाचा आज ४५वा वाढदिवस आहे. या निमित्त त्याला सगळीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्याच्या लाडक्या बायकोने त्याच्यासाठी खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एक रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत तिने तिच्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवासानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (Genelia shares birthday post for husband Riteish )
रितेश-जिनिलीया हे जोडपं बॉलीवूडमधील क्युट जोडप्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडते. या जोडप्याची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली. पुढे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१२मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. आज जिनिलीयाच्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने दोघांचा सुंदर फोटो शेअर करत रितेशसाठी खास पोस्ट लिहीली आहे. जिनिलीया लिहीते, “जर रितेश देशमुख कोण आहे? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर मी एवढंच सांगेन की, तो संपूर्ण जगातला खूप चांगला माणूस आहे आणि तो फक्त माझा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा!”, अशी गोड पोस्ट शेअर केली आहे. रितेशनेही अगदी प्रेमळ कमेंट करत लिहीतो, “आय लव्ह यू बायको, तू माझ्यासाठी काय आहेस याची कदाचित तुला त्याची कल्पानाही नसेल. तू माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवलंस”, असं लिहीत त्याने तिच्या शुभेच्छांवर आभार व्यक्त करत तिच्यासाठी हा गोड मॅसेज लिहिला आहे.
सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनीही लाईक, कमेंट करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरसह इतर कलाकरांनीही ‘हॉपी बर्थडे’ लिहीत त्याला वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश-जिनिलीया ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनाही महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणूनही ओळखलं जातं. हे कपल सोशल मीडियावरही बरंच सक्रिय असते. विविध विनोदी रिल्स, लेकांचे व्हिडीओ स्टोरी रुपात शेअर करत असतात. त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फोटोंना, व्हिडीओंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं.यांपैकी एक आहे. या दघाी एक आहे.