बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांना चाहत्यांचे प्रेमदेखील मिळाले आहे. मात्र आता ती अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती एअरपोर्ट आलेल्या भयंकर प्रकाराबादल सांगताना दिसत आहे. तसेच यामध्ये एअरपोर्टवर एकही कर्मचारी दिसून येत नसल्याचेदेखील समोर आले आहे. तसेच तिच्याबरोबर गैरवर्तन झाल्याचेदेखील ती सांगताना दिसत आहे. घडलेल्या प्रकारामुळे तिच्या कामावरदेखील परिणामदेखील झाल्याचे तिने सांगितले आहे. दिव्याने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (divya dutta viral post)
दिव्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती एअरपोर्टवर दिसून येत आहे. तसेच जिथे विमान येते त्या गेटवर उभी आहे. पण यावेळी तिथे कोणताही कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विमानाबद्दलची कोणतीही माहिती मिळत नाही. तिने इंडिगो फ्लाइटला टॅगकरत लिहिले की, “सकाळच्या वेळी इतका भयंकर अनुभव भेटला त्यासाठी खूप धन्यवाद. रद्द केलेल्या विमानाची कोणतीही सूचना नाही, मी एका रद्द केलेल्या फ्लाइटमध्ये चेकइन करणार आहे. विमाना संदर्भातील कोणतीही घोषणा गेटवर ऐकू येत नाही आहे”.
पुढे तिने लिहिले की, “मदतीसाठी कोणताही कर्मचारी नाही. गेटमधून बाहेर पडताना खूप त्रास झाला. तसेच इंडिगो एअरवेजचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. प्रवाशांबरोबरदेखील गैरवर्तन करण्यात आले. माझ्या चित्रीकरणावर परिणाम झाला आणि आता मी खूप समस्येमध्ये आहे”.
दरम्यान दिव्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, दिव्या आता विक्की कौशलबरोबर ‘छावा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी ती ‘दिल्ली ६’, राजा की आयेगी बारात’, ‘कसूर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘शक्ति’, ‘उमराव जान’, ‘गिप्पी’, ‘ओह माय गॉड’, ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत.