रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी २५०० पोस्ट हटवल्या पण…”, घटस्फोटाबद्दल होणाऱ्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडलं मौन, म्हणाली, “लोकं याकडे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Divya Agarwal Divorce

"मी २५०० पोस्ट हटवल्या पण…", घटस्फोटाबद्दल होणाऱ्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडलं मौन, म्हणाली, "लोकं याकडे…"

अभिनेत्री दिव्या अग्रवाल २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व पाडगांवकरबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली. मनोरंजन क्षेत्रांमध्ये या जोडीच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील रंगली. दोघांच्या फोटो, व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दर्शिविली. आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकतेच दोघेही हनिमूनवरुन परतले. आणि त्यानंतर लगेच दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे सगळे फोटो डिलिट केले असल्याने या चर्चांना उधाण आलं. (Divya Agarwal Divorce)

या चर्चांवर आता दिव्याने मौन सोडलं आहे. दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “मी काहीच बोलले नाही. मी कोणतीही कमेंट किंवा पोस्ट केलेली नाही. मी २५०० पोस्ट हटवल्या. पण मीडियाने फक्त लग्नाचे फोटो न दिसण्यावरच प्रतिक्रिया दिली. लोक याकडे कसे पाहतात आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे, हे पाहणं रंजक आहे. मी नेहमी तेच केलं जे लोकांना माझ्याकडून अपेक्षित नव्हतं. आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत तर घटस्फोट किंवा बाळ? खरं तर यापैकी काहीही नाही”.

आणखी वाचा – सिंगापूरमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहण्यासाठी जमली तुफान गर्दी, वनिता खरातने दाखवली झलक, म्हणाली, “सार्थ अभिमान…”

यापुढे तिने असंही म्हटलं की, “खरं तर आता फक्त मला माझ्या प्रोफाइलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक कथेचा शेवट आनंदी असतो आणि देवाच्या कृपेने माझे पती माझ्या शेजारी शांतपणे झोपले आहेत आणि घोरत आहेत”, असं म्हणत तिने ते दोघेही एकत्र असल्याचं म्हटलं आहे. दिव्या अग्रवाल दोन दिवसांपूर्वीच तिच्या पतीबरोबर दिसली होती. यावेळी, अभिनेत्री वेस्टर्न आउटफिटसह सिंदूर लावूनही दिसली. दोघे एकत्र खूप आनंदी होते आणि दोघांनी एकत्र अनेक फोटो क्लिक केले होते.

आणखी वाचा – शस्त्रक्रियेनंतर राखी सावंतची ‘अशी’ झाली आहे अवस्था, रुग्णालयात हल्लाही झाला अन्…; पूर्वाश्रमीच्या पतीने दिली माहिती, म्हणाला…

‘बिग बॉस ओटीटी सीझन १’ची विजेती दिव्या अग्रवालचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिव्या अग्रवालने तीन महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लग्न केले. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या पतीबरोबर लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा उडू लागल्या. आता अभिनेत्रीने पतीपासून वेगळे होण्याच्या अफवांवर आपले मौन सोडले आहे.

Tags: bollywood actressDivya Agarwal And Apurv PadgaonkarDivya Agarwal And Apurv Padgaonkar WeddingDivya Agarwal Divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi actress Pooja Sawant shared a romantic photo with her husband after three months of marriage.

लग्नाला तीन महिने पूर्ण होताच पूजा सावंतने शेअर केला नवऱ्याबरोबरचा रोमॅंटिक फोटो, म्हणाली, “मिसेस झाल्यानंतर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.