बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणातही दीपिका पदुकोणची कौतुकास्पद मेहनत, ‘सिंघम अगेन’च्या सेटवर करत आहे ॲक्शन सीन शूट, फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 17, 2024 | 7:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone on singham again shoot

गरोदरपणातही दीपिका पदुकोणची कौतुकास्पद मेहनत, 'सिंघम अगेन'च्या सेटवर करत आहे ॲक्शन सीन शूट, फोटो व्हायरल

या वर्षात अनेक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हिंदीतील सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण एका मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. सध्या दीपिका तिच्या या चित्रपटाबरोबरच तिच्या गरोदरपणाच्या चर्चांमुळे अधिक चर्चेत असते. अनेक महिला गरोदरपणामध्ये आराम करण्यास अधिक प्राधान्य देतात. पण दीपिकाने मात्र आराम न करता आपल्या कामाला प्राधान्य दिले आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (deepika padukone on singham again shoot )

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या वर्षी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सिंघम अगेन’च्या कलाकारांचे चेहरे समोर आणले होते. या सर्व कलकारांमध्ये दीपिकाचा लूकदेखील व्हायरल झाला. या लूकमध्ये ती खूप डॅशिंग दिसत आहे. दरम्यान आता चित्रीकरणावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone Indian FC (@teamdeepikain)

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती पोलिस ऑफिसरच्या युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. तसेच चेहऱ्यावर गॉगलदेखील लावलेला दिसत आहे.तसेच तिचे बेबी बंप देखील दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये मुलाला जन्म देणार अशी माहिती सोशल  मीडियावर दिली होती. त्यानंतर ती अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये दोघेही धमाल करताना दिसून आली होती. आता काही दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा ती चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये ती शक्ति शेट्टीची भूमिका साकारत आहे.

आणखी वाचा – तात्या विंचू परत येतोय! आदिनाथ कोठारे व महेश कोठारे यांची मोठी घोषणा, ‘झपाटलेला मी तात्या विंचू’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

दरम्यान या चित्रपटामध्ये ॲक्शन सीन असणार असून आता दीपिकाचे सर्व ॲक्शन सीन बॉडी डबलकडून करुन घेण्यात येणार आहेत. पण असे असतानादेखील अनेक सीन हे खुद्द दीपिकानेच चित्रित केले आहेत. यासाठी तिने तसेच सेटवरील इतरांनीही तिची खूप काळजी घेतली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: deepika padukonesingham againupcoming movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
18 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क, मिथुन व मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाला होणार आर्थिक फायदा? जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.