बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन ही आता आई होणार आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर दीपिका व रणवीर यांनी गुडन्यूज दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची कल्पना दिली होती. त्यानंतर दोघेही अनंत अंबानी व राधिका मर्चट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये धमाल करतानाही दिसले होते. ठीकठिकाणी रणवीर दीपिकाची काळजी घेतानाही दिसतो. अशातच दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण सध्या ती तिचा अभिनय व प्रेग्नन्सीमुळे नाही तर तिच्या वाडिलांमुळे चर्चेत आलेली दिसून येत आहे. तिने तिच्या वाडिलांबद्दलचा एक किस्सा सर्वांबरोबर शेअर केला आहे. (deepika padukone on prakash padukone)
दीपिकाने एकदा दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या वाडिलांबद्दल एक खास किस्सा शेअर केला आहे. तिने तिच्या वडिलांचे माधुरी दीक्षितवर मोठे क्रश असल्याचे सांगितले. हा किस्सा सांगताना माधुरीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होती. २०१६ साली दीपिकाने ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या वडिलांचा मजेशीर किस्सा शेअर केला होता. तसेच तिने आपल्या वाडिलांच्या काही सवयीबद्दलही सांगितले.
तिने सांगितले की, “माधुरीच्या लग्नाची बातमी समजताच वडील खूप नाराज झाले होते. त्यांनी स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घेतले होते”. हे ऐकल्यानंतर माधुरी खूप गोंधळलेली दिसली. तसेच ती पुढे म्हणाली की, “वडिलांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळंदेखील आली होती. त्यामुळे ते किती दु:खी होते याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यावेळी आई त्यांना बाथरुममध्ये जाऊन रडत आहात का? असे देखील विचारत असे”. आम्ही त्यांच्या प्रसंगाची अनेक वेळा मस्करी केली आहे.
माधुरीचे चाहते संपूर्ण देशभरात आहेत. तिचा, अभिनय, नृत्य कौशल्य, सौंदर्य यामुळे अनेकांनी तिला लग्नासाठीदेखील मागणी घातली. मात्र कोणत्याही अभिनेत्याबरोबर लग्न न करता तिने डॉक्टर व अमेरिकेत स्थायिक असलेल्या श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली.
दीपिकाबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती गरोदर असल्याने येत्या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते. तसेच त्यानंतर दीपिका व रणवीर यांनी संपूर्ण वेळ बाळाला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.