बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण ही सध्या खूप चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याची बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर तिच्या बेबी बंपबद्दल देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आजपर्यंत तिने अनेक ठिकाणी आपले पोट लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र चाहत्यांनी खूप चर्चा केली. अनेक वेळा ती ट्रोलदेखील झाली. यावेळी बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींनी तिला पाठिंबा देत सोशल मीडियावर पाठिंबा देखील दिला आहे. त्यानंतर दीपिकाला हिम्मत मिळाली. त्यानंतर आता दीपिका बेबी बंप दाखवताना दिसून आली आहे. (deepika padukone baby bump)
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिचे बेबी बंपदेखील फ्लॉंट करताना दिसत आहे. याबरोबरच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लोदेखील दिसून येत आहे. दीपिकाचा खूप साधा लूक दिसून येत आहे. तिने केसांचा मेसी बन दिसून येत असून न्यूड रंगाची लिपस्टिक लावली आहे. ती या व्हिडीओमध्ये खूप गोड दिसत आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
दीपिका व रणवीर दोघेही एकमेकांना सहा वर्षे डेट करत होते. त्यानंतर २०१८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. मुलांबद्दल एकदा बोलताना रणवीरने सांगितले होते की, “मला मुलं खूप आवडतात. त्यामुळे मी माझे मूल या जगात येण्याची खूप वाट बघत आहोत”.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती याआधी शाहरुख खान बरोबर ‘जवान’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. आता दीपिका ‘सिंघम अगेन’ व ‘कल्की २९८९ एडी’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती प्रेग्नन्सीमध्येच चित्रपटाचे शूटिंग करताना दिसली होती. सेटवरील तिचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे ‘XXX : रिटर्न ऑफ जेंडर केज’नंतर ती कोणत्याही हॉलिवूडपटात दिसून आली होती. त्यानंतर ती कोणत्याही हॉलिवूडपटात दिसून आली नाही.