अनेक कलाकार जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आपल्या प्रसिद्धी ने आपल्या देशाचं नाव मोठं करताना दिसतात. असाच एक मिळणारा मान म्हणजे टाइम्स पेजच्या मुख पृष्ठावर झळकनं. नुकतीच दीपिका सुद्दा या मानाची मानकरी ठरली. पण या मानाने सन्मानित झाल्यानंतर दीपिका ने तिच्या इन्स्टावरील नावात बदल केला आहे. पूर्वी इंग्रजी मध्ये दिसणार तीच नाव बदलून तिने हिंदी मध्ये लिहिलं आहे.(Deepika Padukone Name Change)
आता दीपिका ने नेमकं असं का केलं हे कळण्यास कोणता मार्ग नाही. पण प्रेक्षकांनी तिच्या या कृत्याचा कौतुक केलेलं पाहायला मिळालं. पठाण या चित्रपटापासून दीपिका चांगलीच चर्चेत आली आहे. सोबतच दीपिका तिच्या वेगवेगळ्या फोटोशूट्स साठी देखील ओळखली जाते. प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाल्यावर कलाकार आपल्या मूळ संस्कृतीला विसरतो असा बऱ्याच जणांचा समज होतो पण दीपिका पादुकोण यांसारख्या अभिनेत्रींच्या अशा काही कृत्यांनी हे कलाकार या गोष्टीला अपवाद ठरतात.

दीपिकाने अनेक हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल आहे. जे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. दीपिकाने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सोबत लग्न केले आणि रणवीर दीपिका ही जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली.(Deepika Padukone Name Change)