शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आथिया शेट्टी लवकरच होणार आई, परदेशात अनुष्काबरोबर फिरताना बेबी बंप केला फ्लॉन्ट, व्हिडीओ व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 30, 2024 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
athiya shetty baby bump

आथिया शेट्टी दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वी आथिया व के.एल. राहुल यांनी सिसहल मीडिया वर पोस्ट करत आई-बाबा होणार असल्याची घोषणा सोशल मीडियामार्फत केली होती. त्यामुळे आता के. एल. राहुल व आथियाच्या बाळाची येण्याची वाट सगळेच जण बघत आहेत. अशातच आता अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील दिसून येत आहे. दोघीना एकत्रित बघून आथिया व अनुष्का बेस्ट फ्रेंड्स झाल्याचे म्हंटले आहे. (athiya shetty baby bump)

आथिया व अनुष्का सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. सध्या दोघीही आपल्या पतीना चीयर करण्यासाठी पोहोचल्या आहेत. अनुष्काने पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची ट्राऊजर घातली आहे. तसेच तिच्या मागे आथिया असून स्ट्राइप टॉप घातला आहे. दोघीही एका रेस्टॉरंटमध्ये जात आहेत. यावेळी आथियाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. आथिया व राहुल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमचा सुंदर आशिर्वाद लकरच येतोय 2025”.तसेच या पोस्टमध्ये बाळाची छोटी पावलंदेखील दिसून येत असून खाली आथिया व राहुल असे लिहिले.

आणखी वाचा – “नुसती चिखलफेक, दुर्देवाने…”, प्राजक्ता माळीला पंकजा मुंडेंचा मोठा पाठिंबा, म्हणाल्या, “प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना…”

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथिया व के.एल.राहुल हे खूप महीने एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी कधीही हे माध्यमांसमोर कबूल केले नाही. सुनील यांनी देखील राहुल व अथियाच्या नात्याला परवानगी दिली. दरम्यान आता सुनील शेट्टी खरच आजोबा होणार यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

आणखी वाचा – “माझी मुलगी तीन मुलांबरोबर…”, लेकीच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर भडकली श्वेता तिवारी, म्हणाली, “मीच दर वर्षी लग्न करुन…”

दरम्यान आथियाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘हीरो’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्याबरोबर सूरज पांचोली दिसून आला होता. त्यानंतर ती ‘मुबारका’ व ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्येही दिसून आली. लग्नानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तसेच के. एल. राहुल हा भारतीय क्रिकेटसंघाचा एक उत्तर खेळाडू आहे.  

Tags: Anusha Sharmaathiya Shettybaby bumpk l rahul
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Priya Bapat said that to she cleaned the kitchen no matter how late comes from shooting

प्रिया बापटला इतर गृहिणींप्रमाणेच आहे 'ही' सवय, स्वत:च दिली जाहीर कबुली, म्हणाली, "कितीही वाजता घरी आले तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.