बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटर के.एल.राहुल ही सतत चर्चेत असणारी जोडी आहे. राहुलच्या प्रत्येक मॅचवेळी अथिया त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. पण काही दिवसांपासून तिची मॅचमध्ये गैरहजेरी पाहायला मिळत होती. पण काही दिवसांपूर्वी के. एल. राहुल व संजीव गोयंका यांच्याबरोबर भांडण होत असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे सगळीकडे आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. (athiya shetty on kl rahul)
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांची मॅच पाहायला मिळाली. यावेळी अथिया के.एल.राहुलला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली. मॅचच्या वेळी अथिया राहुलकडे पाहून स्मितहास्यदेखील करत होती.यावेळी अथिया अत्यंत संध्या लूकमध्ये पाहायला मिळाली.
Tia in the stands 🥹🩵.#KLRahul. #AthiyaShetty !! pic.twitter.com/SCxW9zaF9y
— RAHIYA• (@Rahiya_1) March 24, 2024
याआधी राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापदेखील पाहायला मिळाला आहे. लखनऊ सुपर जायंट्स सामना हरल्यानंतर टीमचे मालक संजीव गोयंका यांच्यातील सांभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संजीव राहुलला ओरडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते मालकालाच खडे बोल सुनावताना दिसत आहेत.
दरम्यान हा प्रसंग घडल्यानंतर अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर वादळानंतरचा एक फोटो शेअर करत ‘वादळानंतरची शांतता’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोचा संदर्भ सगळ्यांनी स्टेडियम झालेल्या प्रकाराशी जोडला आहे. दरम्यान या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी केएल राहुलची निवड करण्यात आली नाही. रोहित शर्मा या मॅचचा कर्णधार असून टीम मॅचसाठी अमेरिका व वेस्ट इंडिजसाठी रवाना होणार आहेत.
अथिया व राहुल २०२३ साली लग्नबंधनात अडकले. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीहि लग्न करण्याचा निर्णय घेतला. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्महाऊसवर लग्न पार पडले होते. लग्नानंतर अथिया अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळाली.