सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पायलने एखाद्या पुरुषाला घरी आणलं तर ?”, पत्नीबाबत प्रश्न विचारताच अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तिने असं केलं तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 29, 2024 | 1:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
armaan malik on first wife wedding

“पायलने एखाद्या पुरुषाला घरी आणलं तर ?”, पत्नीबाबत प्रश्न विचारताच अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तिने असं केलं तर...”

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन अनिल कपूर करत असून अनेक खुलासे या शोच्या दरम्यान होत आहेत. यावेळी या कार्यक्रमात कलाकार, युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर यांचा समावेश असलेला दिसत आहे. प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नीबरोबर ‘बिग बॉस ओटिटी’मध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. अरमान,पायल व कृतिका यांच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे होत आहेत. अशातच आता अरमानने त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (armaan malik on first wife wedding)

शो सुरु झाल्यापासूनच तिघं मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. शोमध्ये अरमान, कृतिका व पायल यांना अनेक प्रश्नदेखील विचारण्यात आले. यावेळी स्पर्धक असलेल्या सना मकबुलने अरमानने असा प्रश्न विचारला ज्यामुळे अरमान विचारात पडला. सनाने अरमानला पायलने दुसऱ्या लग्नाचा विचार करण्याबद्दल विचारले.

आणखी वाचा -ओटीटी विश्वात हृता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “ही सीरिज माझ्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

सनाने अरमानला विचारले की, “परिस्थिती थोडी उलटी झाली. म्हणजे पायलने एखाद्या पुरुषाला घरी आणलं तर तुम्हाला काही प्रोब्लम होईल का?”, सनाच्या या प्रश्नावर अरमान भडकला. त्याने उत्तर दिले की, “ती आणून घरात ठेवणार? ते जेव्हा होईल तेव्हा बघू. याचं उत्तर आता नाही देऊ शकत”. सनाने पुन्हा विचारले की, “तुम्ही असं काही झालं तर स्वीकाराल का?”, त्यावर अरमानने उत्तर दिले की, “भलेही पायलने कृतिकाबरोबरचं दुसरं लग्न स्वीकारलं असेल पण पायलचं दुसरं लग्न मी स्वीकारणार नाही”.

आणखी वाचा – ईशा अंबानीचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा, आईप्रमाणेच IVFद्वारे दिला मुलांना जन्म, म्हणाली, “अजिबात सोपं नाही आणि…”

पुढे अरमानने सांगितलं की, “जर पायलने दुसरं लग्न केलं तर तू तुझ्या घरी खुश राहा मी माझ्या घरी खुश राहतो”. त्याच्या उत्तराने घरातील सगळ्यांनाच धक्का बसला. जेव्हा दुसऱ्या लग्नाबद्दलच्या अनेक गोष्टी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात बोलल्या गेल्या तेव्हा पायलला रडू कोसळलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अरमान 2011 साली पहिली पत्नी पायलबरोबर लग्नबंधनात अडकला होता. त्यांना एक मुलगादेखील आहे. त्यानंतर सहा वर्षांतच तो कृतिकाबरोबर लग्नबंधनात अडकला.    

Tags: Armaan malikbig boss ott 3first wiesecond wifeyoutuber
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sameer Vidwans Wedding

सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस अडकला लग्नबंधनात, साधेपणाने वेधलं लक्ष, लग्नातील पहिला फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.