शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 28, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Vicky Kaushal much awaited movie Chhaava is all set to release in the coming new year see the details

विकी कौशलच्या बहूप्रतिक्षित ‘छावा’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, ‘या’ खास दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भव्य चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याची चर्चा सुरु होती. निर्मात्यांनी या चित्रपटाबाबतच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या होत्या. हा चित्रपट म्हणजे विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील त्याची वेशभूषा समोर आली होती. तेव्हापासून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती.

‘छावा’ हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु ‘पुष्पा २’ मुळे ‘छावा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तेव्हापासून ‘छावा’ नेमका कधी रिलीज होणार याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अशातच याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२५ मधील एका खास दिवशी ‘छावा’ प्रदर्शित होणार आहे.  

VICKY KAUSHAL – RASHMIKA – AKSHAYE KHANNA: 'CHHAAVA' NEW RELEASE DATE ANNOUNCEMENT… #Chhaava is now set for a theatrical release on 14 Feb 2025… The release date holds special significance since it coincides with Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on 19 Feb 2025.

Produced… pic.twitter.com/kDMrY7RDqN

— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2024

आणखी वाचा – साखरपुड्यातून यशला गायब करण्यामागे लीलाचा हात असल्याचा दुर्गाचा आरोप, पण सत्य काही वेगळंच, एजेंना बायकोची खेळी समजणार का?

‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागे निर्मात्यांनी खास शक्कल लढवली आहे. ती म्हणजे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काहीच दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधून निर्मात्यांनी ‘छावा’  हा बहुचर्चित व बहूप्रतिक्षित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चित्रपटाला नक्कीच याचा फायदा होईल. ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  

आणखी वाचा – लग्नाचे आमिष दाखवून शोषण, ‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्यावर महिलेचे आरोप, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, ‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री-२ ’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. यामध्ये विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags: Chhaava MovieChhaava Movie Release DateVicky Kaushal Chhaava Movie Release Date
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
malaika arora with son video

मलायका अरोराने लेकाबरोबर सुरु केला नवा व्यवसाय, सारख्याच लूकमध्ये दिसताच चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.