“खामोश…” म्हणत गेली काही दशके बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले अभिनेते म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या अफेअरच्याही अनेक अफवा रंगल्या आहेत. पण त्यांच्या लग्नानंतर सर्व या अफेअरच्या सर्व अफवांना पूर्णविराम लागला . मात्र, त्या गोष्टी वेळोवेळी समोर येतात. शत्रुघ्न सिन्हाही आपल्या तारुण्याच्या अनेक गोष्टी सांगायला मागे राहत नाहीत. शत्रुघ्न सिन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पत्नी पूनम सिन्हाबरोबर आले होते, ज्यात त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आले की, त्यांना कधी रंगेहात पकडले गेले होते का?, तेव्हा अभिनेत्याने याबद्दल संपूर्ण माहिती दिली.
‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या तारुण्यातले दिवस आठवत आपण त्यातून काय शिकलो? याबद्दल सांगितले. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा त्यांना विचारतो की, “सर, तुम्हाला कधी पकडले गेले आहे का?”. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी असं म्हटलं की, “हो, हे खरे आहे. मी एकदा पकडला गेलो होतो. लग्नाआधीआधी पकडला गेलो नसलो तरी मी पकडला गेलो आहे. जेव्हा मला पकडायला हवे होते तेव्हा पकडले गेले नाही. बरं, मला लग्नानंतर पकडलं गेलं, तेव्हा माझी बायको आली आणि मला शिव्या द्यायला लागली आणि तिने मला एवढी मारहाण केली की, माझ्या चेहऱ्यावरचे डाग वाढले.
आणखी वाचा – ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, “तुला लाज वाटत नाही, आता तुला मुलं आहेत आणि तू ही सर्व कृत्ये करतोस. यावेळी मी तुला माफ करते आहे. पण यापुढे मला कोणत्याही मुलीबद्दल माहिती मिळाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. मी कुणाला काहीही कळू दिले नाही”.
दरम्यान, रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. ‘मिलाप’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा अविवाहित होते. शत्रुघ्न सिन्हा व रीना रॉय यांच्या अफेअरची सुरुवात ‘संग्राम’ या दुसऱ्या चित्रपटापासून झाली होती. त्यांनी जवळपास १५ चित्रपट एकत्र केले आणि त्यांची जोडीही खूप हिट ठरली होती. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांनी १९८०मध्ये पूनम सिन्हाबरोबर लग्न केले. तरीही ते त्यांना भेटत असत. त्यानंतर रीना रॉय यांनीदेखील लग्न केले आणि त्यांच्यातील नात्याला पूर्णविराम लागला.