बॉलीवूड मधील अनेक चित्रपट सध्या सिक्वेलच्या रेस मध्ये आहेत. काही गाजतात तर काही पडतात चित्रपटांच्या अशा काळातच आता आणखी एका चित्रपटाचा पार्ट ३ येण्याच्या मार्गावर आहे. जगभरात किंग खान म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता शाहरुख खान ने साकारलेला डॉन आणि डॉन २ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता डॉन ३ संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. पिंकविलाच्या एका रिपोर्ट नुसार डॉन ३ या चित्रपटत अभिनेता शाहरुख खान काम करणार नसल्याचं समोर आलं आहे.(Shah rukh Khan Don 3)
शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे आणि सध्या कमर्शियल चित्रपटांवर भर असल्यामुळे या चित्रपटात काम करणार नसल्याचं चित्रपटांच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.

अनोखी कथा..
फरहान अख्तर यांनी डॉन ३ ची कथा काही तरी वेगळी लिहिल्याचं बोललं जात होत अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या डॉन पासून ते शाहरुखच्या डॉन पर्यंत सगळे डॉन एका चित्रपटात आणण्याचा फरहान यांचा मनसुबा होता त्याप्रकारे डॉन ३ ची कथा लिहिण्यात आली होती पण शाहरुख ने घेतल्याला माघारी मुळे फरहान यांना पुन्हा एकदा डॉन ३ च्या कथेवर काम करावं लागणार आहे.
म्हणून शाहरुख ने (Shah rukh Khan Don 3)
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि तेवढाच चर्चेत राहिलेला शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजला त्यामुळे शाहरुखला सध्या जगभर चालतील, लोक पाहतील असाच चित्रपटांमध्ये काम करायचं आहे त्यामुळे त्येनं हा चित्रपट नाकारल्याचे सांगितलं जात आहे .