बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या त्याच्या नव्या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. यावर्षी त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता पण हा चित्रपट तेवढी चांगली कामगिरी करु शकला नाही. पण सलमानला त्याच्या या चित्रपटाकडून बरीच अपेक्षा आहे. २०१२मध्ये सलमानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच खळबळ माजवली होती. यात तो रॉ एजंट टायगर तर कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर २०१७ला ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कामगिरी केली होती. (Tiger 3 movie poster released)
त्यामुळे आता ‘टायगर ३’ची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता लागून आहे. त्यानंतर ‘टायगर ३’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबाबत बराच काळ सस्पेंस ठेवला गेला होता. मात्र आता सलमाननेच हा सस्पेन्स दूर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
वाचा – ‘टायगर ३’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?(Tiger 3 movie poster released)
नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाली. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाच्या पहिल्या लूकचा पोस्टर रिलीज केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सलमानने पोस्ट केलं की, ‘मी येत आहे. दिवाळी २०२३ला ‘टायगर ३’ यशराजफिल्म ५० सह फक्त आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन दिवाळी साजरी करा. हा चित्रपट हिंदी, तमिळ व तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’
आणखी वाचा – ‘केबीसी १५’ चा पहिला करोडपती ठरला पंजाबचा २१ वर्षीय युवा, जिंकेल का ७ करोड?
शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सलमान व कतरिना दोघेही बंदूक घेऊन दिसत आहेत. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट मागील दोन चित्रपटांपेक्षा अधिक रंजक असणार आहे. चित्रपटात सलमान व कतरिना टायगर, झोयाच्या भूमिकेत पुन्हा कमबॅक करत आहेत. आता या चित्रपट मागील चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.