शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर, मोलकरणीवर संशय, पोलिसांना नक्की काय दिसलं?

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 16, 2025 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
saif ali khan home cctv footage

सैफ अली खानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या खूप चर्चेत आहे. रात्री तीनच्या सुमारास त्याच्या घरात घुसून हल्लेखोराने हल्ला केला. अभिनेत्यावर खूप वारदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान आता सैफवर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर अडीच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वांद्रा पोळीराणी घटनेच्यावेळचे आणि त्याआधीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली आहेत. या सर्व फुटेजमध्ये कोणीही व्यक्ती घरात संशयास्पदरित्या प्रवेश करताना दिसून येत नाही. याप्रकरणी आता तीन संशयास्पद लोकांना ताब्यात घेतलं आहे. (saif ali khan home cctv footage)

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी चोर व हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. आरोपींना पकडण्यासाठी एक टीम तयार केली आहे. एका सिनीयर आयपीएस अधिकाऱ्यांनी या प्रकरणासाठी एक टीम तयार केली आहे. या प्रकरणासाठी नोकर व इतर स्टाफला ताब्यात घेतले आहे. मात्र घरातील मोलकरणीवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान CCTV फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमध्ये कोणीही संशयास्पदरित्या येताना किंवा जाताना दिसत नाही आहे. त्यामुळे हल्लेखोर आधीपासूनच घरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पाइपलाइन किंवा मॅनहोलच्या माध्यमातून घरी प्रवेश केला असेही अंदाज वर्तवले जात आहेत.

आणखी वाचा – Saif Ali Khan Attacked : “हे चोरीचं प्रकरण वाटत नाही”, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित, “संशयास्पद आहे की…”

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

‘आजतक’च्या रिपोर्टनुसार, हल्लेखोर हा आधी तैमुर व जेहच्या खोलीकडे गेला. त्यांच्याबरोबर असलेल्या नॅनीला जाग आली. त्यावेळी नॅनीबरोबर हल्लेखोराची बाचाबाची झाली. त्याचवेळी तिथे सैफ आला आणि शांतपणे बोलू लागला. मात्र त्याचवेळी हल्लेखोराणे त्याच्यावर चाकूने वार केले आणि पळून गेला. दरम्यान आता त्याच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र त्याची पत्नी करीना कपूरने माहिती दिली आहे.

आणखी वाचा – २४ तास घराबाहेर सुरक्षा असूनही नेमका हल्ला कसा झाला?, सैफ अली खानच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित, प्रकरण नेमकं काय?

करीना कपूरच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात अभिनेत्रीने काल रात्रीची घटना सांगितली आहे आणि सैफच्या तब्येतीचीही माहिती दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की, “काल रात्री घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो रुग्णालयात आहे. आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. कुटुंबातील उर्वरित सदस्य सुखरुप आहेत”. पुढे निवेदनात करिनाने चाहत्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, “आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी संयम राखावा आणि आणखी कोणत्याही अफवा पसरवू नका कारण पोलिस आधीच योग्य तपास करत आहेत. असलेल्या काळजीबद्दल सर्वांचे आभार”.  

Tags: bollywood actorcctv footagesaif ali khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर खान बहिणींबरोबर करत होती पार्टी, फोटोमध्ये दिसलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.