मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ग्लॅमरस पूजा सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच पूजा विवाहबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत पूजाने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतने नुकताच तिचा साखरपुडा केला असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरून शेअर केली आहे. (Pooja Sawant Lovestory)
पूजाने सुरुवातीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर प्रेक्षकांना पूजाच्या नवऱ्याचे नाव, तो काय काम करतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली. पूजा व सिद्धेश याचं कसं जुळलं आणि कसं ठरलं? याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं.
पूजाने मुलाखत देत, “आम्ही अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटलो. पण त्यांनतर आम्ही खूप छान मित्र झालो. मला त्याचं स्थळ आलं होतं. त्यानंतर फोनवर आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही एकमेकांचे खूप छान मित्र झालो. फोनवर आम्ही खूप बोललो, खूप वेळ घेतला. एकमेकांबद्दल गोष्टी जाणून घेतल्या. हळू-हळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे अरेंज मॅरेज नसून अरेंज कम लव्ह आहे असं म्हणता येईल” असं ती म्हणाली.
पूजा व सिद्धेशच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलेलं रोमँटिक फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. पूजा व तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या आहेत.