बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंध मुलाची शिकण्यासाठी धडपड, तिरस्कार अन्…; राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’चा प्रेरणादायी ट्रेलर प्रदर्शित, भरत जाधव यांचीही दिसली झलक

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Srikanth movie trailer

अंध मुलाची शिकण्यासाठी धडपड, तिरस्कार अन्…; राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा प्रेरणादायी ट्रेलर प्रदर्शित, भरत जाधव यांचीही दिसली झलक

बॉलीवूडमधील सध्याचा आघाडीचा आणि हरहुन्नरी अभिनेत्यांमध्ये राजकुमार रावचे नाव आवर्जून घेतले जाते. २०१० साली त्याने ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदर्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. अशातच त्याचा एक कमालीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘श्रीकांत’ असून यामध्ये राजकुमार मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. “मै अंधा हू, पैसे मुझे दो, इनको जॉब हम देंगे” अशा त्याच्या अनेक संवादांनी प्रचंड लक्ष वेधले आहे. यामध्ये त्याने एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली असून सर्वांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक केले. त्याच्याबरोबर या चित्रपटामध्ये मराठमोळा सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधवदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे.  (Srikanth movie trailer)

राजकुमारने भारतीय उद्योगपती व बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारली आहे. ते लहानपणापासूनच दृष्टीहीन आहेत. असे असतानाही त्यांनी असे काही करुन दाखवले जे इतर सामान्य मुलाला करणे अशक्य असते. श्रीकांत यांची स्वप्न मोठी होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी जराही कसर सोडली नाही. अंध असूनही ते अभ्यासात खूप हुशार होते. अनेकांनी त्यांची मस्करीही केली. पण त्यांनी न डगमगता त्यांनी यश मिळवले. त्यांची सर्व कहाणी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – “मीही धर्माने मराठी पण…”, घाणेरड्या व लाजिरवाण्या शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं, म्हणाली, “तुमचे संस्कार…”

श्रीकांत यांना स्वतःच्या देशात शिक्षण घेण्यासाठी किती समस्या आल्या याबद्दल दाखवण्यात आले आहे. पण शिक्षणामध्ये अडचणी असतानाही जगातील टॉप कॉलेजमध्ये मॅसाच्युएट्स इन्स्टीट्युटमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यांच्या एकूण प्रवासामध्ये त्यांच्या स्टार्टअपमध्ये देशाचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी गुंतवणूक केली होती.  

आणखी वाचा – “खासगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता?”, साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर लग्न मोडल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, “लग्न म्हणजे खेळ…”

हीच भूमिका घेऊन राजकुमार सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, व निधी परमार हिरानंदानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये राजकुमारबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका व अलाया एकदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून. मराठी अभिनेते भरत जाधव यांनी न्यायाधीशाची भूमिका सकारली आहे. हा चित्रपट १० मे २०२४ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.  

Tags: rajkumar raosrikanthtrailer launch
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
ravi jadhav instagram post

Video : रवी जाधव यांच्या बायकोचा Scuba Diving करत पाण्यामध्येच गुलाबी साडीवर भन्नाट डान्स, एकत्र पोझही दिल्या अन्….; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.