ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी ट्रेलरचे कौतुक केले आहे. सध्या चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशनच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. नाना यांनी अनेकदा बॉलिवूडविषयी आपला स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. अशातच नानांनी नुकताच एका माध्यमाला मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी स्टारडमविषयी स्पष्ट मत केलं आहे. (Nana Patekar talks about Stardom)
नाना पाटेकर यावेळी म्हणाले, “त्यावेळेसच्या स्टार्सना तुम्ही पाहा. दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद साहेब यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. ते सध्या या जगात नसले, तरी आम्ही त्यांना विसरू शकत नाही. मात्र, आजकाल या सृष्टीत रोज नवा कलाकार पदार्पण करतो, त्यांच्या अभिनयाचं लोक तेवढं कौतुकसुद्धा करतात. त्यामुळे सध्या सुपरस्टार होणं खूप कठीण झालं आहे. दर आठवड्याला स्टार बदलतात, ते तर फक्त बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन मोजले जातात.”
हे देखील वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा सोहळा, साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्यभरासाठी…”
पुढे त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक जुन्या-नव्या कलाकारांना नवी ओळख मिळाली असल्याचे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “त्यावेळेस आमच्या सारख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये जास्त संधी मिळत नव्हती. मी, ओम पुरी, इरफान खान, मनोज बाजपेयी, रघुबीर यादव यासारख्या कलाकारांना संधी मिळत नव्हती. मात्र, आता त्यांच्यासाठी ओटीटी नावाचं एक व्यसपीठ तयार झालं आहे. आमच्या सारख्या कलाकारांना आमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. लोक आम्हाला ओळखू लागले, आम्हाला चांगले म्हणू लागले.”
हे देखील वाचा – शाहरुख खानच्या घरी झाले गणरायाचे आगमन, फोटो शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, म्हणाला, “गणपती बाप्पा…”
अभिनेते नाना पाटेकर लवकरच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात झळकणार असून त्यांच्यासह अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन, गिरीजा ओक गोडबोले, सप्तमी गौडा आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.