बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन हा खूप चर्चेत असतो. काही दिवसांपासून तो त्याच्या व्यावसाईक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. आधी पत्नी सुजॅन खानबरोबर घटस्फोट घेतला त्यानंतर त्याची प्रेयसी सबा आझाद मुळे अधिक चर्चेत आला. तो प्रत्येक ठिकाणी सबाबरोबर दिसून येतो. त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत असलेली दिसून येते. अशातच तो पुन्हा चर्चेत आला आहे. हृतिकचा मुलगा रेहान नुकताच पदवीधर झाला असून पदवीप्रदान सोहळ्यासाठी हृतिक व सुजॅन एकत्रित दिसून आले. (hrithik roshan son graduate )
मुलगा रेहानच्या पदवीप्रधान सोहळ्यासाठी हृतिक व सुजॅन दोघेही एकत्रितरित्या दिसून आले. सुजॅनने याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “आपण कुठे जाणार आहोत हे कोणालाही माहीत नसतं. पण आपण आपल्या वाटेवर आहोत हे आपल्याला माहीत असतं. खूप खूप अभिनंदन बाळा. तू खूप हुशार आहेत. मी प्रत्येक दिवशी तुझ्याकडून काही ना काही शिकत असते. मी तुझी आई असण्याचा मल खूप गर्व आहे. रेहान रोशन ही तुझ्या आयुष्यातील एका चांगल्या दिवसाची सुरुवात आहे”. या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हृतिकच्या मुलाबरोबरच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या मुलाचाही पदवीप्रदान सोहळा झाला. महेशने सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुलगा गौतम घट्टामनेनीच्या पदवीप्रदान सोहळ्याचे फोटो शेअर आहेत. या फोटोमध्ये गौतम, पत्नी नम्रता शिरोडकर व मुलगी सितारादेखील दिसून येत आहेत.
हे फोटो शेअर करत महेश बाबूने लिहिले आहे की, “तुझे यश पाहून मला खूप भरून येत आहे. तू पदवी प्राप्त केली आहेस. तुला पुढे खूप शिकायचं आहे. अधिक प्रगती करायची आहे. स्वप्नाचा पाठलाग करत राहा. आम्ही नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहू. मला आज खूप गर्व आहे गौतम घट्टामनेनी”.आई नम्रतानेदेखील मुलाबद्दल खास पोस्ट केली आहे. तिने मुलाबरोबरचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.