सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिनं स्वतःच खूप चुका केल्या आहेत”, सुनीता अहुजानंतर आता गोविंदा बोलला, पत्नीबाबत म्हणाला, “नाही बोललं पाहिजे तेसुद्धा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Govinda Sunita relationship

"तिनं स्वतःच खूप चुका केल्या आहेत", सुनीता अहुजानंतर आता गोविंदा बोलला, पत्नीबाबत म्हणाला, "नाही बोललं पाहिजे तेसुद्धा…"

Govinda Sunita relationship : बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदा आजवर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा इतक्या वाऱ्यासारख्या पसरल्या की शेवटी दोघांनी एकत्र येत या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट केलं. मध्यंतरीच्या काळात गोविंदाची पत्नी सुनीता हिने गोविंदावर गंभीर आरोप केले. मात्र कालांतराने तिने या आरोपांना सांभाळून घेत भाष्य केलं. त्यामुळे त्यावेळी तिचं बोलणं द्विधा मनस्थितीत अडकवणारं वाटलं. यानंतर आता गोविंदानेही पत्नीबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

गोविंदाने नुकतीच काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी पत्नीबद्दल बोलताना गोविंदा म्हणाला, “ती अगदीच लहान मुलासारखी आहे. माझी मुलं तिला त्यांचंच मूल आहे अशा पद्धतीनं सांभाळतात. सुनीता लहान बाळ आहे. पण तिनं आमचं घर सांभाळलं आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ती एक निरागस मूल आहे. तिचे शब्द कधीच चुकीचे नसतात. फक्त एवढंच आहे की, ती जे नाही बोललं पाहिजे तेसुद्धा बोलते”.

आणखी वाचा – पंकज धीर पाठोपाठ दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

पुढे तो म्हणाला, “एक वेळ अशी होती जेव्हा तो तिला समजून घेऊ शकला नाही”. अभिनेता याबद्दल म्हणाला, “पुरुष घर चालवतात, पण स्त्रिया पूर्ण जग चालवतात”. या कार्यक्रमात गोविंदाला सुनीतानं कधी त्याच्या चुका सांभाळून घेतल्या आहेत का?, असा सवाल केला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “तिनं स्वतःच खूप चुका केल्या आहेत. मी तिला आणि संपूर्ण कुटुंबाला अनेकदा माफ केलं आहे. कधी कधी मला असं वाटतं की, आपण त्यांच्यावर खूप निर्भर असतो. विशेषकरुन जेव्हा तुमची आई तुमच्याबरोबर नसते”.

आणखी वाचा – “मोठा आशीर्वाद…”, बाबा होण्यासाठी विकी कौशल उत्सुक, पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, “मी घर सोडणार…”

गोविंदा पुढे म्हणाला, “आई नसल्या कारणानं तुम्ही तुमच्या पत्नीवर खूप अवलंबून असता आणि जसजशी वेळ पुढे जात असते, तुमची पत्नी तुम्हाला तुमच्या आईसारखंच ओरडायला लागते. ती आईसारखंच समजावते. त्यांना हे लक्षात येत नाही पण आपण ते पाहत असतो. आपण पाहत आलेलो असतो की आता ती किती बदलली आहे आणि पूर्वी जेव्हा तरुण होती तेव्हा ती कशी होती”.

Tags: bollywood actorgovindasunita Ahuja
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Marathi serial twist

गुंता अधिक वाढणार, सारंग–आदित्य अडचणीत आणि…; मदतीला अहिल्यादेवी धावणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.