बॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध खलनायक गोविंद नामदेव यांना कोणत्याही ओळखीची तशी गरज नाही. आपल्या अनेक नकारात्मक भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे. वयाच्या सत्तरीतही ते मनोरंजन विश्वात सक्रिय आणि कार्यरत आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे गोविंद नामदेव हे अभिनेते सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत आणि या चर्चेचं कारण म्हणजे त्यांच्याबरोबर एका अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो. अभिनेत्री शिवांगी वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्याबरोबर दिसत आहे आणि लोकांनी त्यांच्या नात्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Govind Namdev and Shivangi Verma)
नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्रीनेही उत्तर दिलं आहे. अभिनेत्री शिवांगी वर्माने अभिनेता गोविंद नामदेव यांच्याबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच तो प्रचंड व्हायल झाला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ‘प्रेमाला वय नसते, मर्यादा नसते.’ यामुळे शिवांगी तिच्या वयापेक्षा ४० वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज नेटकरी बांधू लागले. काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. कोणी दोघांना वडील-मुलीची जोडी म्हटले तर कोणी हे दोघे डेटिंग करत आहेत का? असं विचारलं आहे.
आणखी वाचा – 20 December Horoscope : नवीन गोष्टी घेण्यासाठी शुक्रवारचा दिवस लाभदायक, तुमच्या नशिबात काय?, जाणून घ्या…
मात्र नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारी एक पोस्ट गोविंद नामेदव यांनी शेअर केली आहे. गोविंद नामदेव यांनीही हाच फोटो शेअर करत लिहिले, “हे खरे आयुष्यातील प्रेम नाही. हे रील लाईफ प्रेम आहे. गौरीशंकर गोहरगंज वाले हा चित्रपट आहे, ज्याचे आम्ही इंदूरमध्ये शूटिंग करत आहोत. याच चित्रपटाचे हे कथानक आहे. यामध्ये एक म्हातारा तरुणीच्या प्रेमात पडतो. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या, तरुण व्यक्तीला माझ्या खऱ्या प्रेमात पडणे शक्य नाही. माझी सुधा (पत्नी), माझा श्वास आहे. माझ्या सुधाच्या तुलनेत प्रत्येक प्रकारची सुरक्षितता, लोभ आणि अगदी स्वर्गही फिका आहे. तिच्यासाठे देवाशीही लढेन. ती माझा श्वास आहे”.
दरम्यान, खरे तर हे दोन्ही कलाकार एका कॉमेडी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गोविंद नामदेव हे एक अनुभवी बॉलिवूड अभिनेते आहेत. ज्यांनी तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम केले आहे. ‘बॅन्डिट क्वीन’, ‘सरफरोश’ आणि ‘सत्या’ यांसारख्या चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांसाठी ते आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.