‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. किरण-वैष्णवीचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्नसोहळा पार पडला. सध्या या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बऱ्याच काळापासून किरणने वैष्णवीबरोबरचं नातं गुपित ठेवलं होतं. पण, २९ नोव्हेंबरला अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काही दिवसांत किरणने लग्नाची तारीख जाहीर केली. १४ डिसेंबरला किरण-वैष्णवी लग्नबंधनात अडकले. (Shweta Shinde wished Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar)
लग्नासाठी किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरने खास मराठमोळा पारंपारिक लूक केला होता. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता. तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर तिने मोजके दागिने परिधान केले होते. त्यामुळे दोघं फारच सुंदर दिसत होते. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण, अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम, पूर्वा शिंदे व श्वेता शिंदे यांनी खास हजेरी लावली होती.
आणखी वाचा – 20 December Horoscope : नवीन गोष्टी घेण्यासाठी शुक्रवारचा दिवस लाभदायक, तुमच्या नशिबात काय?, जाणून घ्या…
‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर किरण-वैष्णवी यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती आणि याच मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेता यांनी इन्स्टाग्रामवर दोघांबरोबरचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन. किरण मला खूप आनंद होत आहे की, शेवटी तुला तुझ्या स्वप्नातील व्यक्ती सापडली आहे आणि तुला ती आपल्या ‘देवमाणूस’ सेटवर सापडली”.
आणखी वाचा – प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव करतायत ४० वर्षे लहान अभिनेत्रीला डेट?, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
यापुढे श्वेता यांनी असं म्हटलं आहे की, “तुम्हा दोघांना आशीर्वाद देताना आणि भविष्यात पाऊल टाकताना पाहून खूप छान वाटते. तुमचे वैवाहिक जीवन चिरंतन, परिपूर्ण आणि रोमांचित होवो. तुम्ही दोघे कायम आनंदी आणि सुखी रहा. दोघांना खूप खूप प्रेम”. दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण मालिकांनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळाला. तर वैष्णवी सध्या ‘सन मराठी’वरील ‘तिकळी’ मालिकेत दिसत आहे.