बॉलिवूडचा शहेनशहा अभिनेते अमिताभ बच्चन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच ते चर्चेत असतात. अशातच अमिताभ यांनी त्यांचा जुहू येथील बंगला लेकीला दिल्याने ते विशेष चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला ५० कोटी रुपयांचा आलिशान बंगला भेट दिला आहे. जुहूमधील त्यांचा ‘प्रतिक्षा’ हा बंगला आता श्वेता बच्चनच्या नावावर झाला आहे. श्वेता बच्चन नंदा एक उत्तम लेखिका आहे व उद्योजक आहे. (Amitabh Bachchan Property)
अमिताभ बच्चन यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. लाइफस्टाइल एशिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे ३,१९० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचा ‘जलसा’ या आलिशान बंगल्याची किंमत ११२ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचे ‘जनक’ व ‘वत्स’ हे बंगलेही आहेत. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रेंज रोवर ऑटोबायोग्राफी, रोल्स रॉयस फैंटम, लेक्सस एलएक्स570 व ऑडी ए8एल सारख्या आलिशान गाड्या त्यांच्याकडे आहेत. याशिवाय बिग बी यांच्याकडे एक खाजगी जेट देखील आहे, ज्याची किंमत सुमारे २६० कोटी आहे.
बिग बींकडे असलेली संपत्ती व श्वेता बच्चन यांना ५० कोटींचा बंगला भेट दिल्यानंतर आता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की, अमिताभ बच्चन यांच्याकडे जे काही आहे, ते सर्व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचं असेल? मात्र असं काही होणार नसून अमिताभ बच्चन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कौन बनेगा करोडपती या रिऍलिटी शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पष्टपणे सांगितले की, अभिषेक बच्चनला त्यांची संपूर्ण मालमत्ता मिळणार नाही.
T 4230 – https://t.co/tTX69tWAc6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2022
"मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे ;
जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे !"
~ हरिवंश राय बच्चन
Abhishek तुम मेरे उत्तराधिकारी हो – बस कह दिया तो कह दिया !
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत फार पूर्वीच सांगितले होते. एका कार्यक्रमादरम्यान बिग बी म्हणाले होते की, ‘जेव्हा आम्ही या जगात नसू, तेव्हा आमच्याकडे जे काही आहे ते आमच्या मुलांचे असेल. आम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे. ते दोघांमध्ये समसमान प्रमाणात विभागले जाईल”. यावरून अमिताभ बच्चन यांच्या सर्व संपत्तीवर अभिषेक बच्चन व श्वेता नंदा यांचा समान हक्क असणार हे स्पष्ट झाले आहे.