बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु आहे. सध्या अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये कडवटपणा आला आहे. लवकरच ते घटस्फोट घेतील अशा चर्चादेखील उधाण आले आहे. अशातच आता अमिताभ यांची नात व श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली नंदा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीबरोबर नव्याच्या डेटिंगच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. दोघेही ऋषिकेश येथे गेले होते. तेथील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. तसेच त्यांना अनेकदा एकत्रितही पाहिले गेले होते. (amitabh bachchan grand daughter breakup)
नव्या व सिद्धांत यांच्या डेटिंगच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या एका रिपोर्टनुसार, नव्या व सिद्धांत एक आता वेगळे झाले आहेत. त्यांचे नातं खूप छान सुरु होतं. मात्र ब्रेकअपनंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्याबद्दल चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. याआधी दोघंही एकमेकांच्या पोस्ट लाइक करत असत मात्र आता तेही करणं बंद केलं आहे.
नव्या सध्या तिच्या सोशल मीडियावर तिच्या पाळीव श्वानाचे फोटो पाहायला मिळत आहेत. असे अनेक फोटो दिसल्याने नव्याने तिचे दु:ख विसरण्यासाठी नवीन पर्याय शोधला आहे असेही म्हंटले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये नक्की कोणते सत्य आहे? हे जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. तसेच सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो याआधी नेटफ्लिक्सवरील ‘खो गए हम कहा’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर यामध्ये अनन्या पांडे व आदर्श गौरवदेखील दिसून आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
तसेच नव्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती एक पॉडकास्टमध्ये दिसून येत आहे. हा तिचा स्वतःचा पॉडकास्ट असून अनेक कलाकार या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना दिसून येतात. यामध्ये जया बच्चन व श्वेता नंदा यांनीही उपस्थिती दर्शवली होती.