गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षर कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान, फोटोही केला शेअर, म्हणाला, “भारताचा विकास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 20, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
akshay kumar first time vote

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षर कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान, फोटोही केला शेअर, म्हणाला, "भारताचा विकास…"

आज महाराष्ट्रातील मुंबई येथे शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. मतदानासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आता ५६ वर्षीय अभिनेता अक्षय कुमारने देखील सकाळी लवकर रांगेत उभे राहून मतदान केले आहे. भारतीय नागरिक म्हणून त्याने पहिल्यांदाच मतदान केले असून इतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिक म्हणून पाहिल्यांदाच मतदान करताना किती आनंद होत आहे याबद्दलही तो व्यक्त झाला आहे. (akshay kumar first time vote)

अक्षय मतदान करत असल्याचे एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला.  त्याने रांगेत उभे राहून मतदान केले. तसेच मध्यमांशी संवाद साधताना म्हणाला की, “माझा देश मजबूत असावा, विकास व्हावा असे वाटते. हे सर्व लक्षात ठेऊन मी मतदान केले आहे. ज्याला योग्य वाटते त्याला व्यक्तीने मतदान करावे. तसेच मतदानाची टक्केवारी चांगली राहील असे मला वाटते”.

आणखी वाचा – Video : मतदानाची मशीन बंद, तासन् तास लोक रांगेत अन्…; आदेश बांदेकरांनी पवईतील प्रकार आणला उघडकीस, दाखविली सत्य परिस्थिती

#WATCH | Actor Akshay Kumar shows the indelible ink mark on his finger after casting his vote at a polling booth in Mumbai.

He says, "…I want my India to be developed and strong. I voted keeping that in mind. India should vote for what they deem is right…I think voter… pic.twitter.com/mN9C9dlvRD

— ANI (@ANI) May 20, 2024

त्यानंतर माध्यमांनी त्याला विचारले की, “रांगेत उभे राहून आपलं नंबर येण्याची वाट बघावी लागत आहे. हे सर्व कसं वाटत आहे?”, त्यावर अक्षय म्हणाला की, “मी काय करावं? रांग मोडून पुढे जाऊ? , तसेच पहिल्यांदा मतदान केल्यावर कसे वाटते? यावर त्याने बोटाला असलेली शाई दाखवत म्हणाला की, “मला खूप छान वाटत आहे”.

आणखी वाचा – सायली-अर्जुनमध्ये नवं कॉन्ट्रॅक्ट?, प्रपोजही करणार, बहरणार प्रेमाचं नातं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

अनेक वर्षांपासून अक्षयच्या नागरीकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित राहिले होते. या विषयावरुन अनेकदा त्याला ट्रोलदेखील केले गेले. त्यानंतर त्याने २०१९ साली भारतीय पासपोर्टसाठी अर्जदेखील केला होता मात्र कोरोना समस्येमुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब लागलं. त्यानंतर २०२३ साली अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले. भारताचा नागरिक झाल्यानंतर त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडले असल्याचेही सांगितले.

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता  टायगर श्रॉफबरोबर ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. तसेच आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी’च्या तिसऱ्या भागात अर्शद वारसीबरोबर दिसून येणार आहे.

Tags: akshay kumarindian citizenvote
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
Next Post
Bollywood actress Deepika Padukone's baby bump is seen in a viral video on social media

Video : गरोदर बायकोची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह, दीपिका पदूकोणने दाखवला बेबीबम्प, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.