Aamir Khan Santosh Deshmukh Family Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रभर घडणाऱ्या विविध घटनांमुळे अशांतता पसरली आहे. त्यातीलच एक प्रकरण म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील संतोष यांची डिसेंबर २०२४मध्ये अमानुष हत्या करण्यात आली. हे प्रकरण अजूनही निवळलेलं नाही. संतोष यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब झटत आहे. त्यांच्या कुटुंबियांची झालेली अवस्था डोळ्यांत पाणी आणणारी आहे. राजयकीय क्षेत्रातील अनेक मंडळी संतोष यांच्या कुटुंबाला भेट देत आहेत. सांत्वन करत आहेत. दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता आमिर खानने संतोष यांच्या कुटुंबियांना भेट दिली आहे. ही भावनिक भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
संतोष देशमुखांच्या लेकाला भेटताच आमिर खान भावुक
आमिरने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसह पुण्यात संतोष यांच्या कुटुंबासह त्यांच्या मुलाचीही भेट घेतली. त्याने संतोष यांचा मुलगा विराज देशमुख याचं सांत्वन केलं. तसेच त्यांचा भाऊ धनंजय देशमुखशीही संवाद साधला. ही भेट अगदी भावनिक होती. आमिरने साधेपणा जपत संतोष यांच्या कुटुंबासह जमिनीवरच बसला. त्यांच्याशी मायेचा संवाद साधला. इतकंच नव्हे तर संतोष यांच्या लेकाला घट्ट मिठी मारली. आमिरच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी भावनिक भेट, पाहा व्हिडीओ
पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमध्ये पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान आमिरने संतोष यांच्या कुटुंबाल भेटायचं ठरवलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिरचं कमेंटद्वारे सगळ्यांनी कौतुक केलं आहे. तसेच इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनीही संतोष यांच्या कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं होतं असं म्हटलं आहे. शिवाय संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून जोरदार मागणीही केली आहे.
आणखी वाचा – इंडस्ट्रीमध्ये घाण, काम करणाऱ्यांचे हाल अन्…; गणेश आचार्यांकडून धक्कादायक माहिती, सांगितलं काळं सत्य
आमिर खानला माणूसकी आहे, मराठी कलाकारांनी माणूसकी विकली का?, आमिर खानलाही यांचं दुःख कळालं. इतरांना कधी कळणार?, आमिर खानला सलाम, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, आमिर खानसारखी माणसं महाराष्ट्रात असल्याचा अभिमान आहे. अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर अशांतता पसरली. जाहिर निषेध व आरोपींना फाशीची मागणी करण्यात आली. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी मिळणार का? हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.