बॉलिवूड अभिनेता आमीर खान हा नेहमी चर्चेत असतो. आजवर आमिर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला दिसून येतो. २०२१ साली त्याने दुसरी पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघही अनेकदा एकत्रितपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले. आमिरची मि. परफेक्श म्हणूनही ओळख आहे. वयाच्या ५९ वर्षीदेखील तो एकदम फिट असलेला दिसून येतो. अशातच आता त्याने प्रकृतीविषयी भाष्य केल्यामुळे तो आता चर्चेत आला आहे. त्याच्या व्यक्तव्याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आमिर नक्की काय म्हणाला? हे आपण आता जाणून घेऊया. (aamir khan statement)
सध्या आमिर ‘तारे जमीन पर’चा सिक्वल ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्याने सांगितले की, “मी माझ्या आयुष्यात कधीही एकत्र सहा चित्रपट केले नाहीत. याबद्दल माझ्याकडे माझी काही कारणं होती. जेव्हा मी विचार केला की मी आता एकही चित्रपट सोडणार नाही. त्यानंतर माझ्या मनात लगेचच एक विचार केला की आता कदाचित माझ्याकडे काम करण्यासाठी फक्त १० वर्षच बाकी आहेत”.
पुढे तो म्हणाला की, “तुम्ही आता आयुष्यावर इतका विश्वास नाही ठेऊ शकत नाही. उद्या माझा मृत्यूदेखील होऊ शकतो. मी आता केवळ १० वर्ष चांगले ठणठणीत आयुष्य जगू शकतो. मी आता ५९ वर्षाचा आहे. त्यामुळे आता आशा आहे की ७० वर्षांपर्यंत मी इतका ठणठणीत राहीन की काम करु शकेन. त्यामुळे मी विचार केला की आता १० वर्ष चांगले काम करणार आहे”.
त्यानंतर आमिर म्हणाला की, “आता माझे वय वाढत आहे. मी त्या लोकांना सपोर्ट करणार त्यांना मी नेहमी पाठिंबा देणार. ७० व्या वर्षी निवृत्ती घेण्याआधी टॅलेंटेड लोकांसाठी चांगला प्लॅटफॉर्म बनवणार आहे. त्यासाठी मी अजून चित्रपटांची निर्मिती करणार आहे”. दरम्यान आमिरने २०२२ साली निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. त्यावेळी तो ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता.