अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या चांगलंच उधाळ आलं आहे. अभिनेत्रीने बच्चन परिवाराचं घर सोडलं असून ती तिच्या आईकडे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. या दरम्यान तिच्या लेकीच्या म्हणजेच आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात या कार्यक्रमात अभिनेता अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन व अभितेत्री ऐश्वर्या रॉय एकत्र दिसले. या कार्यक्रमात आराध्याच्या सुंदर अभिनयाची झलक सगळ्यांना पाहायला मिळाली. (aaradhya bachchan shows her acting skills)
या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील एक व्हिडीओ ऐश्वर्याच्या लेकीचा म्हणजे आराध्याच्या व्यासपीठावरील अभिनयाचा आहे. त्यात ती स्टेजवर दिसत आहे. त्यात तिने नाटकाशी जुळता मेकअप केला आहे. तिच्या डायलॉगचं डायमिंग, अभिनय हे सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहता सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आराध्या एक उत्तम अभिनेत्री असल्याचंही बोललं जात आहे.
नेटकऱ्यांनी आराध्याची तुलना शाहरुखच्या मुलीशी म्हणजे सुहानाशी व श्रीदेवीच्या मुलीशी म्हणजे खुशी कपूरशी केली आहे. ज्यांनी नुकतंच ‘द आर्चीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोघांपेक्षा आराध्या खूप चांगली अभिनेत्री असल्याचं बोललं जात आहे. चाहत्यांना आराध्याची डायलॉग डिलिव्हरी खूप आवडली. चाहत्यांनी कमेंट करत ऐश्वर्याच्या लेकीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘आराध्याच्या हावभावांपासून ते तिच्या डायलॉगबाजीपर्यंत तिने हे सिद्ध केलं की ती बच्चन कुटुंबियांची व ऐश्वर्या—अभिषेकची मुलगी आहे’. नाटकातील तिने साकारलेल्या पात्राने चाहत्यांना ‘मॅलेफिशिएंट’मधील ऐश्वर्याचा आवाजाची आठवण करु दिली.
काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. त्यातील एक कमेंट म्हणजे शेवटी आराध्याचं कपाळ दिसलं. या कार्यक्रमातील पात्रासाठी आराध्याने तिचे सर्व केस मागे बांधले होते. त्यामुळे यावेळी तिची वेगळी हेअर स्टाईल पाहायला मिळाली. याअगोदर आराध्याचा नेहमीचा हेअर कट सगळ्यांना पाहिला होता. त्यामुळे आता तिचं कपाळ दिसलं असल्याच्या कमेंट सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.