सध्या सोशल मीडियावर सर्वत्र प्राजक्ता माळीची चर्चा सुरु आहे. बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे नेते सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले आहे. त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. प्राजक्ताने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच तिने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी असे निवेदनही केले. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार प्राजक्ताला पाठिंबा देताना दिसले. त्याच प्रमाणे राजकारणीदेखील पुढे आले आहेत. अशातच आता पंकजा मुंडेदेखील पुढे आल्या आहेत. (pankaja munde on prajakata mali)
गेल्या दोन दिवसांपासून पत्रकार परिषदेनंतर मनोरंजन तसेच राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक जण तिच्या समर्थनार्थ पुढे आले. भाजपच्या नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळीचं समर्थन केले आहे. याबाबत पंकजा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये लिहीले आहे की, “शक्तीशिवाय कोणत्याही नकारात्मक उर्जेचा संहार झाला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलियुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.भावना कुठे आहेत?”.
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 29, 2024
पुढे तिने लिहिले की, “चिमूकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या थांबवणे शक्य आहे. पण ते कायद्याने व नियमाने. ते राहिले बाजूला. नुसती चिखलफेक. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट ही स्त्री आणि तिचे सत्व आहे. काल पहावलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना. आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?तरीही एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपोआप साथ मात्र राहावी. Be strong and make us proud you all #women”. असं म्हणत पंकजा यांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, वस्तुस्थिती मांडून कठोर कारवाई मागणी करणार असल्याची माहिती प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच कोणत्याही पुराव्याशिवाय ज्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत, त्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला.