‘बिग बॉस ९’ मुळे चर्चेत राहिलेली सिनेसृष्टीतील एकमेव जोडी म्हणजे युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमात पडलेल्या या जोडीने लग्न करत त्यांचं प्रेम सिद्ध केलं. आता युविका व प्रिन्स त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. हे दाम्पत्य त्यांच्या लहान मुलाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच, प्रिन्सने त्याची गरोदर पत्नी युविकासाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. युविकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ७ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी युवकाने एक सुंदर पांढरा ड्रेस परिधान केला होता. ऑफ-शोल्डर स्लीव्हजसह असलेला हा खास ड्रेस साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. (Yuvika Chaudhary Baby Shower)
युविकाच्या ड्रेसमध्ये गुलाबी रंगाच्या धनुष्यची डिझाईन होती, तर प्रिन्सने पांढऱ्या पँटसह निळा शर्ट घातला होता. ग्लॅमरस मेक-अप व कुरळे केस यामुळे युविकाच्या लूकमध्ये वाढ झाली होती. युविकाच्या बेबी शॉवरची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचे गोंडस बाळ म्हणजेच तिचा पेट गोगो तिला चिकटून बसला होता आणि तिच्या मिठीत तो खूप खुश दिसत होता. बेबी शॉवरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी डोहाळ जेवणाला केलेली सुंदर सजावट. एक गोंडस बाळाचा फोटो बॅकड्रॉपला लावण्यात आला होता, ज्यावर जगाचा नकाशा होता आणि त्याच्या बाजूला दोन मोठे टेडी बेअर ठेवले होते.
संपूर्ण पार्श्वभूमी निळ्या,गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या फुग्यांनी सजवली होती. निशा रावल, संभावना सेठ, रफ्तार आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी युविकाच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. युविका व प्रिन्स यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहे. दोघांची लव्ह स्टोरी ‘बिग बॉस ९’मध्ये सुरू झाली होती. ते या शोमध्ये भेटले होते व तिथेच प्रेमात पडले. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमात पडल्यावर आणि काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी हे दोघेही खूप उत्सुक आहेत. युविकाचे डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.