अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमांतून आपल्या खुमासदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भूरळ पाडली. शिवाय, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना नेहमीच आपलंस केलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या निवेदिता सराफ अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत दिसत आहे. त्याचबरोबर रंगभूमीवर ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक सध्या सुरु असून त्या नाटकालाही रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Nivedita Saraf honored Maharashtra State Government Award)
‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाटकात निवेदिता सराफ या मंजुषा हे पात्र साकारत आहे. त्यांच्या या पात्राला रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून त्यांच्या याच अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अभिनयाचा रौप्य पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांसमोर शेअर केली आहे.
हे देखील वाचा – झाडाखाली निवांत क्षण, आराम अन्…; स्वतःच्या फार्महाऊसवर पोहोचली प्राजक्ता माळी, चाहत्यांना दिसलं फरसाण, म्हणाले, “फरसाणची गोष्ट…”
निवेदिता सराफ यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओत निवेदिता नाटकातील अन्य कलाकारांसह दिसत असून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना या पुरस्काराची एक झलक दाखवली. यावेळी त्या म्हणाल्या, “‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या आमच्या नाटकासाठी मला महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक मिळालं आहे. हे फक्त टीमवर्क असून ते केवळ माझ्या एकटीचं नाही, तर आम्हा सर्वांचं आहे. म्हणून हा सन्मान माझं नसून आमचे निर्माते चंद्रकांत लोकरे, कलाकार सुयश टिळक, रश्मी अनपट, श्रीरंग देशमुख,आमचे लेखक-दिग्दर्शक नितीश पाटणकर, लेखक आदित्य मोडक आणि या नाटकाच्या संपूर्ण टीमचं आहे.”
हे देखील वाचा – “मराठीत बोलायला लाज वाटते?” भाषेवरून ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आम्ही कोणत्या…”
निवेदिता सराफ यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत. शिवाय, त्यांच्या चाहत्यांनीदेखील कमेंटद्वारे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.