शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१६ माणसांचा स्वयंपाक बनवू शकत नाहीत वर्षा उसगांवकर, पोळ्या बनवायलाही जमेना, म्हणाल्या, “फुटेजसाठी काहीही करणं…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 30, 2024 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi update Varsha Usgaonkar said that I cannot cooked for 16 people know more

१६ माणसांचा स्वयंपाक बनवू शकत नाहीत वर्षा उसगांवकर, पोळ्या बनवायलाही जमेना, म्हणाल्या, "फुटेजसाठी काहीही करणं..."

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत असतानाच वर्षा यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.‘बिग बॉस’ सुरु होण्याआधी त्या ‘बिग बॉस’मध्ये जाणार असल्याच्या अनेक चर्चा होत होत्या. यामुळेच त्यांचा सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील प्रवास संपला होता. ‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी त्यांच्या अनेक चर्चा होत होत्या आणि आता ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतरही त्यांच्या नावाच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात येण्याचा त्यांचं प्रवास खूप रंजक होता. त्यांच्या याच प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मी ‘बिग बॉस’च्या घरात येईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे या घरात येऊन मी स्वत:लाच एक सरप्राइज दिलं आहे. मी या घरात येणार हे मी फक्त माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. माझ्या आईला व माझ्या बहीणींना याबद्दल अजूनही माहित नाही”. यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी या घरात सहभागी झाल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया मला बघायला आवडेल”. तसेच या घरात मला माझ्या १५ मांजरींना घेऊन जायला आवडेल असंही त्यांनी म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “त्यांची चप्पल पुसायचीही तुझी लायकी नाही”, वर्षा उसगांवकरांची अक्कल काढल्यानंतर निक्कीवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “असभ्य बोलणं…”

यानंतर त्यांनी रितेश देशमुख यांचे सूत्रसंचालन आवडत असल्याचेही सांगितलं. तसेच “घरातील कोणतं काम त्यांना करायला आवडणार नाही” या प्रश्नाचे उत्तर देताना वर्षा यांनी असं म्हटलं की, “मला गोलाकृती पोळ्या लाटता येत नाहीत. मला १६ माणसांचा स्वयंपाक बनवता येत नाही. बाकी मी कापून देण्याचे वगैरे काम करेन” असं म्हटलं. त्याचबरोबर वर्षा यांनी त्यांच्या रणनीतीबद्दल असं म्हटलं की, “मी सरळ स्वभावाने चालणारी बाई आहे, त्यामुळे मी माझा हा मार्ग कधीही सोडणार नाही आणि उगाच फुटेज मिळवण्यासाठी किंवा कंटेट देण्यासाठी मी काहीही करणार नाही” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – मुस्लिम धर्मही फॉलो करत नाही करीना कपूर खान, तिने दुसऱ्याच धर्माचा केला स्वीकार, जवळच्या व्यक्तीचा खुलासा, म्हणाली, “तिने मुलांना…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या पहिल्याच दिवशी निक्की व वर्षा यांचं भांडण झालं आहे.  वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात न भांडताही आपलं वर्चस्व राखणार का? घरातील सर्व तरुण स्पर्धकांशी त्या नेमक्या कशा वागणार? टास्कमध्ये त्या कशा पद्धतीने सहभागी होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.       

Tags: bigg boss marathibigg boss marathi new seasonvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Thrala Tar Mag fame actress Jui Gadkari said that Duttguru brought her out of illness.

आजारपणातून दत्तगुरुंनी काढलं बाहेर, जुई गडकरीला मोठी प्रचिती, म्हणाली, "आजारपण त्यांच्याच पायावर सोडलं आहे कारण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.