शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून हळहळला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “एकटा राहतो…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 9, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan removing the garbage Utkarsh Shinde special post for him

Bigg Boss Marathi मध्ये सूरज चव्हाणला घरातील कचरा काढताना पाहून हळहळला उत्कर्ष शिंदे, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वामधील एक स्पर्धक सध्या चांगलाच जोमात येत आहे. घरासह घराबाहेरील अनेक प्रेक्षकांकडून या स्पर्धकांचं कौतुक होत आहे आणि हा कलाकार म्हणजे सूरज चव्हाण. त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरुवातीला त्याला या घरात त्याला त्याचा जम बसवणे अवघड झालं होतं. मात ‘बिग बॉस’ने त्याला आत्मविश्वास दिल्यानंतर त्याने आपला खेळ सुरु केला आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. याचबरोबर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळीही त्यांच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Update)

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाबद्दल किरण माने, पुष्कर जोग, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कालकार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कलाकारांपैकी आणखी एक कलाकार पहिल्या दिवसापासून सूरजला पाठींबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजबद्दल त्याच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच नुकत्याच प्रोमोमध्ये सूरज घरात झाडू मारताना पाहायला मिळत आहे. कॅप्टन अंकिता वालावलकरने स्पर्धकांना दिलेल्या ड्युटी नुसार सूरजच्या वाटेला बाहेरच्या आवारातील केर काढण्याचं काम येतं. 

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Keshavrao Bhosale Theatre Fire : ऐतिहासिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक, कलाकारांना अश्रू अनावर, नेमकं काय झालं?

या प्रोमोवरही उत्कर्षने त्याच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने या व्हिडीओखाली कमेंट करत असं म्हटलं आहे की, “ही ड्यूटी नको ती ड्यूटी नकों कधी बोलला, नाही. शिक्षण नसुनही कधी भाषेत माज किंवा दुसऱ्यांचा अपमान दिसला? नाही. कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? नाही. कोणत्या मुलीचा अपमान केला? नाही. खेळात टिकण्यासाठी खोटं प्रेमाच नाटक, रडणं, रुसणं, फुगणं असलं काही केलं का?, नाही. एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार आणि दिसणार.”

आणखी वाचा – बायको असावी तर अशी! Bigg Boss Marathi मधील रितेशच्या कामाचं जिनिलीयाकडून कौतुक, म्हणाली, “प्रिय नवरा तू खूप …”

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात सूरजचा खेळ पाहून प्रेक्षकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीच कशाला तर घरातील स्पर्धकांनीही त्याला इथे का आणलं आहे, असा सवाल केला. या शोमध्ये येऊन तो काय करणार?, तो चुकीच्या शोमध्ये आला आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. मात्र सूरजला ‘बिग बॉस’ने पाठिंबा दर्शवल्यानंतर सूरजमध्ये झालेला बदल पाहून त्याला आता सबंध महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 

Tags: bigg boss marathi 5Suraj Chavanutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Deeepika Padukone Viral Video

Video : गरोदरपणात अशी दिसत आहे दीपिका पदुकोण, चाहत्याच्या लहान मुलाला अभिनेत्रीने पाहिलं अन्…; 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.