मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आली. गेल्यावर्षी पूजाने सोशल मीडियावरुन खास फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. (Pooja Sawant Wedding Unseen Photo)
लग्नाला सहा महिने पूर्ण होताच तिने आपल्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिला गोड सरप्राइज देखील दिलं आहे. याचा फोटो पूजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. “सहा महिन्यांआधी आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासातील प्रत्येक दिवस सुखाचा होता. तुम्ही सर्वांनी मला आणि सिडला(Sid) दिलेलं प्रेम, आशीर्वाद यासाठी आम्ही दोघं कायम ऋणी असू. आमच्यावर असंच प्रेम करत राहा”, असं कॅप्शन देत तिने लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
पूजाला तिच्या नवऱ्याने देखील खास सरप्राइज दिलं असल्याचं तिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत दाखवलं आहे. “Happy Six Moths Boju” अशी चिठ्ठी लिहून त्याच्या बाजूला सिद्धेशने गुलाबाचं फूल ठेवल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. लाडाने पूजाचा नवरा तिला बोजू अशी हाक मारतो. पूजा तिचा हा खास दिवस तिच्या नवऱ्याबरोबर साजरा करणार आहे. सध्या पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलिया येथे आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते हा स्पेशल दिवस एकत्र घालवत साजरा करणार आहेत.
पूजाचा होणार नवरा सिद्धेश चव्हाण सध्या भारतात राहत नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करतो. मात्र तो मूळचा मुंबईचा आहे. कामानिमित्त तो काही काळ ऑस्ट्रेलियात राहत आहे. त्यामुळे काम व शूटिंगमधून वेळात वेळ काढत पूजा ऑस्ट्रेलिया भारत असा दौरा करत असते. पूजाने लग्नाला सहा महिने पूर्ण होताच शेअर केलेल्या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.