bigg boss marathi raqesh bapat sister : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लोकप्रिय अभिनेता राकेश बापटवर झालेले आरोप अनेकांना खटकले. अनुश्री माने आणि रुचिता जामदारने राकेशवर केलेले गंभीर आरोप अनेकांना पटले नाहीत. त्यांच्या आरोपानंतर राकेश खूप दुखावला. यावेळी घरातील सदस्यांनी त्याच्या बाजूने वक्तव्य केलं. दरम्यान, घराबाहेर अनेक कलाकारांनी राकेशच्या समर्थनार्थ पोस्ट केली. शिवाय त्याच्या चाहत्यांनीही त्याची काही चूक नसल्याचं म्हटलं. आता या सगळ्या पाठोपाठ राकेशच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणावर भाष्य केलं. राकेशची बहीण शीतल बापट यांनी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत भावाला पाठिंबा दर्शविला आहे.
शीतल बापट यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत असं म्हटलं आहे की, “वुमन कार्ड’ खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. अनेक महिला अशाप्रकारे याचा गैरवापर करतात आणि ज्या स्त्रियांना खरंच मदतीची आवश्यकता आहे, त्यांना योग्यवेळी मदत मिळत नाही; यामुळे या समाजात महिलांबद्दल चुकीची धारणा निर्माण होते. स्ट्राँग, स्वावलंबी महिला कधीच असं वागत नाहीत. माझा भाऊ राकेश बापटवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो याबाबतीत कधीही चूक करणार नाही, मला याची पूर्ण खात्री आहे. त्याला गेल्या दोन दिवसांत जो काही पाठिंबा मिळालाय… हे पाहून खरंच मला आनंद झालाय.”
आणखी वाचा – “त्याला कसलंच व्यसन नाही”, गेल्या तीन वर्षांपासून लिव्हइनमध्ये राहते राधा पाटील, म्हणाली, “आमचा बेडरुम…”

अनुश्री माने हिच्या एका वक्तव्यामुळे राकेश आणि अनुश्री यांच्यात भांडण झालं अनुश्रीने केलेल्या चुकीच्या आरोपांवर राकेश भडकला त्याने म्हटलं “२५ वर्षांच्या करिअरमध्ये कोणीही माझ्याबद्दल असं बोललेलं नाही. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत,” असं म्हणत राकेश भावूक होताना ही दिसला. हा वाद घरातच नव्हे, तर बाहेरही चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर राकेश बापटला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.





