शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharala Tar Mag च्या सेटवर थाटात साजरं झालं लेकीचं बोरन्हाण, कलाकारांच ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून चाहते खुश, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 21, 2026 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Monika Dabade Daughter 

Tharala Tar Mag च्या सेटवर थाटात साजरं झालं लेकीचं बोरन्हाण, कलाकारांच ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून चाहते खुश, फोटो समोर

Monika Dabade Daughter  : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आणि ही मालिका लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेतील सगळेच कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. या मालिकेतील अभिनेत्री मोनिका दाबाडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. लेकीच्या जन्मानंतर तर ती लेकीला म्हणजेच वृंदाला घेऊन व्हिडीओ, रील शूट करताना दिसते. इतकंच नाहीतर मोनिका नवऱ्यासह बरेचदा खाण्याची वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करताना दिसते. वृंदाला तर ती अगदी लहान असल्यापासून सेटवर घेऊन जाते. त्यामुळे सेटवर वृंदाचे बरेच लाड होताना पाहायला मिळतात.

आता तर मोनिकाने वृंदाचे बोरन्हाण थेट सेटवरच केले आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे मोनिकाला तिच्या परिवारासोबत हा कार्यक्रम करता आला नाही त्यामुळेच तिने आपल्या मालिकेतल्या परिवारासह हा सोहळा साजरा केला असल्याचं व्लॉगमध्ये म्हटलं. यावेळी सेटवरचे सगळे कलाकार व इतर क्रू मेंबरही सहभागी झाले होते. मोनिकाने आपल्या लेकीला हलव्याचे दागिने घालून नटवलं होतं.

आणखी वाचा – २५ वर्षांपूर्वीची इच्छा, बोलायचं राहिलं आणि…; अतुल परचुरेंच्या आठवणीत लोकप्रिय अभिनेते भावुक, म्हणाले, “या जन्मात…”

View this post on Instagram

A post shared by Monika Dabade (@mostly_monika)

बोरन्हाणसाठी आजीचे कर्तव्य अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी पार पाडले. यावेळी त्यांनीही काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते. तर मावशी म्हणून जुई आणि प्रियांका यांनी चुरमुरे आणि बोरांचा वर्षाव करत जबाबदारी सांभाळली. . मोनिकाने व्लॉगमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रॉडक्शनचे आभार मानले. त्यांनी तिला सेटवर आपल्या लेकीचे बोरन्हाण कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. त्यासाठी लागेल ती मदतही केली.

आणखी वाचा – “त्याला कसलंच व्यसन नाही”, गेल्या तीन वर्षांपासून लिव्हइनमध्ये राहते राधा पाटील, म्हणाली, “आमचा बेडरुम…”

सध्या मालिकेत मोनिकाचा महत्त्वाचा ट्रॅक चालू असल्यामुळे तिला सुट्टी मिळणं मुश्किल होतं. तिचे कुटुंब पुण्यात राहत असल्यामुळे तिला तिथे जाणे शक्य नसल्याने सेटवरच हा घाट घातला, असल्याचं तिने व्हिडीओमध्ये सांगितलं. मालिकेत कितीही खटके उडत असले तरी ऑफस्क्रीन सगळे एकत्र किती छान राहतात हे या व्हिडीओद्वारे पाहायला मिळालं आहे.

Tags: monika dabadeMonika Dabade DaughterTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Ranapati Shivray Swari Agra

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपती महाराजांना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या खास पसंतीस

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.