‘बिग बॉस’चं पाचवं पर्व नुकतंच दिमाखात पार पडले आहे. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याच्या विजयाने सर्वत्र आनंद व्यक्त केला आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुखनेदेखील त्याच्या बरोबर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छादेखील दिल्या होत्या. त्यानंतर इतर सहभागी स्पर्धकांनीदेखील त्याच्याबरोबर व्हिडीओ करत जल्लोष साजरा केला आहे. धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांनी त्याला शुभेच्छा देतानाने व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच सूरजने आता या पर्वातील माजी स्पर्धक पॅडी म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. (suraj chavhan on paddy kamble)
‘बिग बॉस’च्या घरामध्ये असताना पॅडी व सूरज यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. प्रत्येक गोष्टीमध्ये पॅडी सूरजला पाठिंबा देताना दिसला. दोघांच्याही मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला तसेच बघायला मिळाले. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर सूरज पॅडी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सूरजचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो यामध्ये म्हणाला की, “पॅडी दादांनी मला खूप जीव लावला. मी त्यांना माझा मोठा भाऊ मानतो. ते माझ्या वाडिलांसारखेच आहेत. त्यांनी मला जमवून घेतलं आणि समजूनही घेतलं. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला”.
पॅडीनेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “मैत्रीच्या दुनियेतील अनोखी यारी. सूरज व पॅडी दादाची ही दोस्ती न्यारी”. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. या व्हिडीओमधून पॅडी व सूरज यांची मैत्री दिसून येत आहे. तसेच त्यांच्यातील निखळ प्रेमही समजून येत आहे.
या व्हिडीओला चाहत्यांनीदेखील खूप पसंती दर्शवली आहे. तसेच प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. सूरजच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर सूरजला फक्त आत्या आणि पाच बहिणी आहेत. एकूण आठ बहिणी होत्या. त्यापैकी काही वारल्या. त्यामुळे तो आठवा कृष्णा आहे. टिकटॉकवेळी सूरजला दिवसाला रिबिन कापायला८०,००० हजार रुपये मिळायचे. त्यावेळी एक दिवसाचे मानधन ८०,००० तो घ्यायचा. आतापण तो एका दिवसाचे ३० ते ५० हजार घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी त्याला खूप लूटलं. आता सूरज हा कठीण प्रवास करत ‘बिग बॉस मराठी’चा विजेता ठरला.