Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची अगदी धमाकेदार सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम वेगळाच आनंद सर्वांना देईल असं वाटत होतं. एका मागोमाग एक आलेले आणि एका पेक्षा एक असलेले हे स्पर्धक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. अनेक मंडळी या स्पर्धकांना सपोर्ट करताना दिसत आहेत. यंदाच्या या नव्या पर्वात केवळ कलाकारच नव्हे तर गायक, कीर्तनकार, रील स्टार या विविध कला क्षेत्रातील कलागुलांनी अशा भरलेल्यांना संधी दिली. सर्वांसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. यंदाच्या या ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी देखील सहभाग घेतला.
कायमच आपल्या अभिनयानं, नृत्यांना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या वर्षा यांना संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम लाभले. आजही त्या ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असल्यातरी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या वयाचा मान ठेवून इतर स्पर्धकांना टोला लगावताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवशी वर्षाताई व निक्की तांबोळी या स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. असं पाहायला गेलं तर निक्कीने पहिल्याच दिवसापासून वर्षाताई यांना टार्गेट केलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. वर्षाताईंबद्दल निक्कीची भाषा उर्मटपणा पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून निघाला आहे. अशातच वर्षाताई यांच्या आणि घरातल्या सर्व स्पर्धकांच्या चुकीमुळे ‘बिग बॉस’च्या पहिल्या आठवड्याची कॅप्टनसी गेल्याने निक्की तांबोळी वर्षाताईंना नको नको ते बोलते.
आणखी वाचा – Bigg Boss Ott ची विनर ठरली सना मकबूल, ट्रॉफीसह मिळाली तब्बल इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव
माईक न घालणे, दिवसा झोपा काढणे, घरात अस्वच्छता ठेवणे या सर्व कारणांमुळे ‘बिग बॉस’ने घरातल्या स्पर्धकांना शिक्षा ठोठावली. यावरुन निक्कीने वर्षा यांच्यामुळे हे सर्व झालं असं म्हटलं. ‘बिग बॉस’चे म्हणणे ऐकल्यानंतर वर्षा म्हणतात, “आपण ‘बिग बॉस’चा आदर करायला पाहिजे”. यावर निक्की म्हणते, “सगळे मोठे-मोठे म्हणून तुमची चाटत आहेत ना ते बंद करा. आता काय होऊन बसलं आहे ते बघा. बेल्ट घाला असं मी आधीपासूनच सांगत होते आता सगळं गेलं आता चाटा अजून त्यांची”. यावर इतर स्पर्धक चुका सगळ्यांच्या आहेत त्यामुळे एकाला बोलून अजिबात चालणार नाही असं म्हणतात. इतकं बोलूनही निक्की काही शांत बसत नाही. त्यांनतर वर्षा ‘बिग बॉस’च्या घरातील कॅमेरासमोर जात निक्कीबद्दल बोलतात. त्या म्हणतात, या निक्की नावाच्या माज असणाऱ्या, मग्रूर तरुणीची काय भाषा आहे. चाटण वगैरे, चाटायचं ही काय भाषा आहे”, असं बोलून राग व्यक्त करतात.
आणखी वाचा – नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, “रडू थांबतच नाही कारण…”
त्यानंतर पुन्हा वर्षा व निक्की यांच्यात बाचाबाची होते. तेव्हा निक्की वर्षा ताईंना म्हणते, “मी सरळ येऊन तुम्हाला बोलणार मला तुमच्याकडे असणाऱ्यांसारखे बोलायला चमचे नको आहेत”. त्यानंतर निक्की जान्हवीला म्हणते, “मी असं काही बोलेन ना सगळा गेम खराब होऊन जाईल”. यावर वर्षा म्हणतात, “अरे बापरे. मी घाबरले’. यावर निक्की म्हणते, “घाबरायला पाहिजे. तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि त्यांची बाजू घेणाऱ्यांनीही बॅग पॅक करा. नाहीतर त्यांची चाटत बसा. आणि भाषा ऐकायची नसेल तर कानात बोटं घालून बसा”, अशा अति वाईट शब्दात वर्षा यांचा अपमान करते.