Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. यंदाच्या पर्वात आलेले स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. यंदाच्या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, गायक, अभिनेते, अभिनेत्री, रॅपर अशा विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना संधी मिळाली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातून आलेले हे स्पर्धक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून कलाकारांची भांडण पाहायला मिळाली. यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात एका स्पर्धकाची विशेष चर्चा रंगलेली दिसली ही स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी.
निक्कीने तिच्या अरेरावीपणाने ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला. निक्कीने स्पर्धकांशी मैत्री केली तर अनेकदा दुष्मनी केली. निक्की व अरबाजची मैत्री सध्या घरात पाहायला मिळत आहे. तर अभिजीत व निक्की यांच्यातही काही काळ मैत्री पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात टास्क दरम्यान निक्की व अभिजीत पुन्हा भांडताना दिसले. निक्कीला अभिजीतने दिलेले ज्ञान खटकले असल्याचं सांगितलं. शिवाय अभिजीतची शाळा घेत निक्कीने त्याची बोलती बंद केली. मात्र याला अभिजीतनेही सडेतोड उत्तर दिलं.
अशातच अभिजीत व निक्की यांचा एका टास्क दरम्यानचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला म्हणते, “तू डबलढोलकी आहेस”. यावर अभिजीत म्हणतो, “तुम्ही तुमचे शब्द जपून वापरा”. यावर निक्की अभिजीतला म्हणते, “तू तुझी सोच ठिकाण्यावर ठेव”. हा वाद पाहून डीपी म्हणतो, “२२ कॅमेरे हे तुमच्यावर आहेत. थांबा आता”. तर अंकिता ओरडून सांगते, “आता या कॅप्टन्सीचं एक वेगळं नाव असेल दोघात तिसरा आता कॅप्टन्सी विसरा”.
निक्की व अभिजीत यांच्यात प्रोमोवरुन वाद झालेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की अभिजीतला म्हणते, “तू मला सांगू नकोस. शब्द जपून वापर, मुद्दे कसे मांडत आहेस. तुलाही माहित आहे की या घरात अगदी पहिल्या दिवसापासून मुद्दे मांडत आहे. तू मला म्हटलं शब्द जपून वापर”. यावर अभिजीत वाद घालत म्हणतो, “मी कुठे नाही म्हटलं. कारण त्याच्याआधी तू मला म्हणाली शब्द जरा जपून वापर. तुला कळत नाही का? असंही तू मला म्हणाली. आणि त्याच्यावर मी तुला उत्तर दिलं”. यावर निक्की म्हणते, “मी वैयक्तिक मुद्द्यावर बोलले. तू चुकीचा अर्थ घेतला”.