‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक मंडळींमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच या पर्वात स्पर्धक मंडळींमधील वाद पाहणंही रंजक ठरत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी यांची मैत्री संपलेली पाहायला मिळाली. आणि आता दोघींमध्ये वादही झालेला पाहायला मिळत आहे. जान्हवी पहिल्या दिवसापासून तिचा खेळ ‘टीम ए’बरोबर खेळत होती. अरबाज, वैभव, निक्की हे तिघे तिचे जवळचे मित्र होते. मात्र, कालांतराने जान्हवी अन् निक्कीची मैत्री तुटली. (Bigg Boss Marathi Season 5 new promo)
आता जान्हवी वैयक्तिकरित्या तिचा गेम खेळताना दिसत आहे. तरीही, जान्हवीची अरबाज-वैभवबरोबर मैत्री कायम आहे. त्यामुळे अरबाजने कॅप्टन्सी उमेदवारीमधून जान्हवीला बाद करणं तिला अजिबात पटलं नाही. याबद्दल टास्क संपल्यावर जान्हवीने दोघांकडे विचारपूस केली. तेव्हा तिला हे निक्कीने करायला सांगितलं असल्याचं कळालं. हे ऐकताच जान्हवीचा पारा चढला. आणि जान्हवीने निक्की व अरबाज विरोधात खेळायचा निर्णय घेतला.
आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचा राग अनावर झालेला पाहायला मिळत असून ती टीम बी कडे निक्की विरोधात बोलताना दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी म्हणते, “ट्रॉफी मिळो ना मिळो पण हिचा गर्व उतरवायचा आहे”, असं बोलताना दिसली. यानंतर जान्हवी व निक्की अगदी समोरासमोर येत एकमेकींना भिडताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : चुकीला माफी नाही! निक्कीच्या कानाखाली मारणं आर्याला पडणार महागात, घराबाहेर काढणार का?
समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणते, “दम असेल तर मला बाहेर काढून दाखव. चॅलेंज आहे”. यावर निक्की म्हणते, “कॅप्टन्सीमधून काढलं आहे त्याचा तिला खूप राग आला आहे”. यावर जान्हवी निक्कीवर आवाज चढवत म्हणते, “तुला कोणी मराठी जनता ओळखत नव्हती म्हणून तू या शोमध्ये आली आहेस. सगळ्यांना घाण झाली आहेस तू या घरामध्ये”. यावर निक्कीही जान्हवीवर ओरडून बोलते, “बघा हिचे गटार सारखे शब्द आहेत”. त्यावर जान्हवी म्हणते, “उगीच फडफड, फडफड चल”. आता हा प्रोमो पाहून हा वाद नेमका का झाला याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.