शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : प्रेमात मिळाला मोठा धोका, गोलीगत सूरजने पहिल्यांदाच सांगितली प्रेमकहाणी, म्हणाला, “गोरापान मुलगा आवडला तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 15, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 suraj chavan lovestory

गोलीगत सूरज चव्हाणचं या कारणामुळे झालं होत ब्रेकअप, पहिल्यांदाच भाष्य केलं आणि...

Bigg Boss Marathi Season 5  : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात धुमाकूळ घालणारा एकमेव स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण. एका छोट्याशा खेडेगावातून रिल स्टार म्हणून टिकटॉकच्या दुनियेत राज्य करणाऱ्या सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. विनोदी रील व्हिडीओ बनवत त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर तुफान सक्रिय असलेला सूरज ‘बिग बॉस’च्या घरात इतर स्पर्धकांसह उत्तम खेळ खेळताना दिसून येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजचा खेळ पाहून त्याने साऱ्यांचीच मन जिंकली आहेत. सबंध महाराष्ट्रातून सूरजवर भरभरुन प्रेम केलं जात आहे. पहिली दोन आठवडे सूरज शांत होता मात्र ‘बिग बॉस’ आणि प्रेक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. याशिवाय रितेश देशमुखने सूरजच्या खेळाचं कौतुक केलं आणि त्यानंतर सूरज जोमाने खेळू लागला.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, अहोरात्र मेहनत करणारा सूरज आता ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडतोय. सूरजला खेळ जरी नीट कळत नसला तरी माणूस म्हणून तो किती योग्य व उत्तम आहे याची अनेक उदाहरणं त्याने ‘बिग बॉस’च्या घरात दिली आहेत आणि यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होताना पाहायला मिळतोय. सूरजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम कहानी बाबत नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात भाष्य केले आहे. सूरजने प्रेमात मिळालेल्या धोक्याबाबत भाष्य करत त्याचं मन मोकळं केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझं तोंड बंद कर…”, डीपी व आर्यामध्ये भांडण, वादाला तोंड फुटणार, म्हणाली, “तुमचं ऐकायला…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की सूरजला म्हणते, “तुला प्रेमात धोका मिळाला?, आणि कधी”, यावर सूरज म्हणतो, “हो मिळाला”. निक्की पुढे म्हणते, “तू प्रेम केलं होतं. तिने बुक्कीत टेंगुळ तर नाही दिलं ना?”. यावर सूरज म्हणतो, “नाही. माझ्याबरोबर चांगली राहायची. चांगली बोलायची. नंतर तिला गोरापान चांगला मुलगा आवडला तर मला सोडून गेली. गोलीगत धोका मला दिला. मला खूप राग आला आणि मग मी ठरवलं स्वतःच काहीतरी करावं. मग मी मोठा स्टार झालो. लोकांच्या मनावर राज्य केलं. माझी गाणी सर्वत्र वाजतात”.

आणखी वाचा – Navra Maza Navsacha 2 Teaser : विनोदी डायलॉगबाजी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’चा टिझर प्रदर्शित, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांची लक्षवेधी झलक

यावर निक्की विचारते, “त्यानंतर तू कधी बघितलं का तिला. तिचं नाव काय आहे?”, यावर सूरज नाही असं बोलतो. सूरज म्हणतो, “आता नाही. तिचं आता चांगलं सुरु आहे. ते पाहून खूप भारी वाटत आहे. तिच्या आयुष्यात माझं पिल्लू खुश आहे”, असंही तो म्हणत लाजतो.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5suraj chavan lovestory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
surekha kudachi on bigg boss marathi season 5

  "गद्दार कोण?", टास्कदरम्यान अरबाज-वैभवची वागणूक पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने विचारला जाब, तर सूरजचं कौतुक, म्हणाल्या, "काहीतरी शिजत होतं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.