‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी ‘आमचं ठरलं’ तर म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांच्या लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. दोघांनी आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan On Ganeshotsav)
आता गणेशोत्सवानिमित्तही ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव मुग्धा व प्रथमेश एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गणेश उत्सवातील खास फोटो शेअर केला आहे.मुग्धा व प्रथमेश गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या गावी म्हणजेच कोकणातील घरी गेले आहेत. प्रथमेश हा मुलाचा कोकणातील आहे. त्यामुळे तो बरेचदा त्यांच्या गावी जात असतो. तर कामानिमित्त त्यांना मुंबई, पुण्यात राहावं लागतंय.
आणखी वाचा – चुकीला माफी नाही! नियम तोडणाऱ्यांना ‘बिग बॉस’ने सुनावली शिक्षा, कॅप्टन म्हणून सूरजचाही पारा चढला अन्…
प्रथमेश व मुग्धाला गावाकडची ओढ आहे. नेहमीच ते गावी जात तेथील अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. अशातच गणेशोत्सवासाठी मुग्धा व प्रथमेश कोकणात गेले असल्याचं दिसतंय. यापूर्वीही मुग्धाने कोकणात गणपती बाप्पांची मूर्ती घडवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. गणपती बाप्पांची मूर्ती घडवण्याची कार्यशाळा ही लघाटे बंधूंचीच आहे. त्यामुळे हा वेगळा असा अनुभवही मुग्धाने पहिल्यांदा घेतला. सासरी मुग्धा चांगली रमलेली असून ती प्रत्येक सण साजरा करताना दिसते.
आणखी वाचा – दीपिका आई होताच राखी सावंतचा आनंद गगनात मावेना, थेट दुबईतच बाळासाठी केली शॉपिंग, व्हिडीओ समोर
आता गणेशोत्सवातील खास फोटो शेअर करत, “रंभ तूच यशकीर्तीचा जीवनी गणेशा,दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव”, असं कॅप्शन दिलं आहे. यावेळी मुग्धा व प्रथमेशचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे.